सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 05 January

दैनिक परिपाठ 
05 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना


🔺️ सुविचार 

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा

मी कुणासाठीतरी आहे

ही भावनाच किती श्रेष्ठ !

🔺️ दिनविशेष 

२००४ : ’संभाजी ब्रिगेड’ या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

१९९८ : ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

१९९७ : रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

१९७४ : अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद

📋 बातम्या 

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 

▪️वाक्प्रचार व अर्थ : तणतणत निघून जाणे- खूप रागाने निघून जाणे. 

▪️वाक्य : आईचे बोलणे ऐकून अन्सार तणतणत निघून गेला.

🔺️ म्हणी व अर्थ 

▪️म्हण : तहान लागल्यावर विहीर खणणे 

▪️अर्थ  : एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे

🔺️ कोडे 

▪️मान असून डोके नाही . 

▪️उत्तर-बाटली

🔺️ सामान्यज्ञान 

१) ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' हे कोणी म्हटलेलं आहे ?

उत्तर - स्वातंत्र्यवीर सावरकर

२)  भारतावर सर्वात जास्त वर्षे राज्य करणारे कोण ?

उत्तर - इंग्रज

 ३) रवींद्रनाथ टागोरांनी इंग्रजांना कोणती पदवी परत दिली ?

 उत्तर - सर

 ४) जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य असणारा देश ?

 उत्तर - भारत

५) तीन रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणाला काय म्हणतात ?

 उत्तर - तिठा

🔺️ बोधकथा 

बोधकथा: कष्टाचे फळ

एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण त्याची चारही मुले मात्र अतिशय आळशी होती. शेतकरी म्हातारा झाला होता आणि त्याला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत होती.

​एके दिवशी शेतकऱ्याने चौघांनाही जवळ बोलावले आणि सांगितले, "मुलांनो, आता मी जास्त दिवस जगणार नाही. आपल्या शेतात मी एक गुप्त धन पुरून ठेवले आहे. माझ्या पश्चात तुम्ही ते उकरून काढा आणि सुखाने राहा."

​काही दिवसांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वडिलांनी सांगितलेल्या 'गुप्त धना'च्या आशेने चौघा भावांनी संपूर्ण शेत उकरून काढले. पण त्यांना तिथे कुठेही सोन्या-नाण्याचे हंडे सापडले नाहीत. ते खूप निराश झाले.

​त्याच वेळी पावसाळा सुरू झाला. शेत उकरलेले होतेच, म्हणून त्यांनी त्यात बी-बियाणे पेरले. त्या वर्षी शेतात इतके उत्तम पीक आले की, ते विकून त्यांना खूप पैसे मिळाले. तेव्हा त्यांना वडिलांच्या शब्दांचा खरा अर्थ उमजला. कष्ट हेच खरे 'गुप्त धन' होते.

तात्पर्य (Moral of the story):

"कष्टाशिवाय फळ मिळत नाही आणि मेहनत हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे."

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »