दैनिक परिपाठ
10 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.
🔺️ दिनविशेष
१९२९ : जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
१९२६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२० : पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
१८७० : बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
१८७० : जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली.
१८६३ : चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
📋 बातम्या
▪️वाक्प्रचार व अर्थ : कान झाकून घेणे - न ऐकणे, दुर्लक्ष करणे.
▪️वाक्य : शिक्षक शिकवत असताना राजेशने कान झाकून घेतले.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : पी हळद हो गोरी .
▪️अर्थ : अति उत्साही होणे.
🔺️ कोडे
▪️दोन अक्षरात सामावले माझे नाव
मस्तक झाकणे आपले माझे काम
ओळखा पाहू मी आहे कोण?
▪️उत्तर- टोपी
🔺️ सामान्यज्ञान
1)राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्याकरिता किमान वयोमर्यादा किती आहे ?
उत्तर - ३५ वर्ष
2) DNA च्या संरचनेत ________ हे नत्र रेणू असतात?
उत्तर - B, A व C
3) मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?
उत्तर - तीन
4) ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर - मोडक सागर
5) कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची नेमणूक केली जाते ?
उत्तर - कलम २८०
🔺️ बोधकथा
कष्टाचे फळ
एका गावात एक म्हातारा शेतकरी रहात होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहितच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.
त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या.
दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जावून विकले व त्यांना भरपूर धन मिळाले. गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडीलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, ‘मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon