छान छान गोष्टी भाग 64
![]() |
वाचा रे वाचा! |
प्राणीमात्रांवर प्रेम करा
एके दिवशी नदीच्या बाजूला काही मुले खेळत होती. त्यातील एका साबू नावाच्या मुलाला एक छोटस व गुबगुबीत असे सशाचं पिल्लू दिसल. ते बघून साबु ओरडला, "अरे वा, पिल्लू” ते ऐकल्यावर गब्बू, ठब्बू, मोनू, सोनू, राधू असे सर्वजण खेळता खेळता थांबले व त्यांनी आपल्या नजरा चहुबाजूंनी फिरवल्या.
एकदम एवढया सगळया मुलांना पाहून ते सशाचे पिल्लू खूपच घाबरले व ते लपण्यासाठी एका झुडपात घूसले. हे साबूने पाहिले होते. म्हणून साबू लगेच तिकडे पळत गेला. ते बघून सर्वच मुल त्याच्या पाठोपाठ गेली. ते पिल्लू घाबरलेल बघून त्या मुलांनी हातात एक लाकडी काठी हातात धरून ते सर्वजण त्या गुबगुबीत पिल्लाला काठीने टोचू लागले.
टोचल्यामुळे त्या बिचाऱ्या पिल्लाला त्रास होत होता, परंतु त्याला बोलता येत नव्हते की ओरडता येत नव्हते. ते स्वतःच्या बिळाचा रस्ता चुकले होते व त्याची शिक्षा ते भोगत होते. निमूटपणे काटयाच्या टोचण्या सहन करत होते.
एवढयात तेथे नदीवर स्नानासाठी साईबाबा आले. त्यांनी बघितले की, झुडूपाजवळ सर्व मुले काटक्याने एका छोटया पिलाला टोचत होती व ते पिल्लू बिचारे घायाळ अवस्थेत पडले होते.
बाबांना त्या पिल्लाची खूप दया आली. त्यांनी आपल्या हातातील कपडे व लोटा पटकन रेतीच्या ढीगाऱ्यावर फेकला.
ते पळतच मुलांकडे गेले व म्हणाले, “अरे बाळांनो हे काय करता आहात? त्या गरीब प्राण्याला का त्रास देत आहात. तुमच्या हातातील या काटक्या तुम्ही मला टोचा, पण त्या लहान पिल्लाला टोचू नका. आणि जर मला टोचावेसे वाटत नसेल तर तुमच्यापैकी एकाला कोणाला तरी टोचा. मी देखील तुम्हाला टोचू लागतो.”
ते ऐकून मुलांना फारच लाज वाटली व त्यांनी सर्वांनी बाबांची क्षमा मागितली. ती बाबांना म्हणाली, “बाबा, आम्हाला माफ करा यापुढे आम्ही असा खोडकरपणा कधीही करणार नाही.”
बाबांनी त्यांना सांगितले की, ‘ठिक आहे, परंतु मुलांनो इथून पुढे कधीही कोणत्याही प्राण्यांना त्रास देऊ नका. ते आपल्याला कधीही त्रास देत नाही. म्हणून आपण देखील प्राण्यांवर दया करायला पाहिजे. प्राणी संपत्तीचे रक्षण करा. प्राण्यांचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे.
यातून आपल्याला एक बोध होतो, आपण बघतो आहोत की, देशातील वाघ, सिंह, चित्ते या सारखे प्राणी आता नष्ट होत चालले आहेत. जर आपण प्राण्यांना मारत राहिलो तर भविष्यात आपल्याला प्राणी अजिबात बघायला मिळणार नाहीत.
साईबाबांनी शेवटी मुलांना सांगितले, “आपण सर्वांनी एकच नारा केला पाहिजे, प्राण्यांचे संरक्षण करा! प्राण्यांचे संरक्षण करा.” .
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : Colors रंग
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon