वाचा रे वाचा! |
राजदरबारात प्रवेश
राजा कृष्णदेवरायांची कीर्ती ऐकून दूर देशचे पंडित, कवी, कलावंत त्याच्याकडे विजयनगरला येत असत. एकदा तेनालीरामही आला. पण विजयनगरला आला तरी राजदरबारात प्रवेश कसा मिळणार! एकदोन दिवस अशा चिंतेत आणि शोध घेण्यातच गेले. तिसऱ्या दिवशी नदीवर स्नानास गेला असताना अशाच एका ब्राह्मणाची आणि तेनालीरामची गाठभेट झाली. बोलता बोलता तेनालीरामने राजदरबारात प्रवेश कसा मिळेल आणि राजा कृष्णदेवराय याची भेट कशी होईल हे वचारले. त्यावर त्या ब्राह्मणाने, 'राजगुरु ताताचार्य म्हणून आहेत. त्यांच्यामार्फत हे काम होईल. ' असे सांगितले.
तेनालीरामची स्वारी लगेच ताताचार्यांच्या दारात हजर! पण ताताचार्यांचे दर्शनही दुर्लभ! अनेक ठिकाणांहून अनेक कामांसाठी अनेक लोक त्यांच्याकडे येत-जात असत. दरवारचीही पुष्कळच कामे त्यांच्यामागे होतीच. तेव्हा एवढ्या गडबडीतून ताताचार्य तरी कसे भेटावेत?
सकाळ-संध्याकाळ तेनालीराम मोठ्या आशेने ताताचार्यांच्या दारात येऊन उभा राहायचा. सात-आठ दिवस असेच गेले. एके दिक्शी मात्र ताताचार्य एका लग्नमंडपात जाताना तेनालीरामने पाहिले, आणि तोही त्यांच्या पाठेपाठ घुसला. संधी साधून ताताचार्यांपुढे जाऊत उभा राहिला आणि म्हणाला, 'मी एक कवी आहे, मला सप्रायांचे दर्शन घडवा.' त्यावर ताताचार्याने हुडत करून तेनालीरामला बाजूला सारले.
तेनालीरामला या अपमानाचा राग आला. पण करणार काय? ताताचार्य पडले राजगुरू!
'पण एके दिवशी ताताचार्यही तेनालीरामच्या तडाख्यात सापडले. त्या दिवशी जरा लौकरच तेनालीराम तुंगभद्रा नदीवर स्नान करायला गेला होता. स्नान उरकून निघाला, तो एका खडकावरही सगळे कपडे ठेवून ताताचार्यदेखील स्नान करताना दिसले. आणि ताताचार्यांनी त्या दिवशी साधी लंगोटीही लाक्लेली नव्हती. तेनालीरामचा खट्याळ स्वभाव जागृत झाला. त्याने हळूच, मांजराच्या पायाने जाऊन खडकावर ताताचार्यांचे धोतर, उपरणे आदि सगळे कपडे काखोटीला मारले आणि तसाच एका खडकाच्या आडोशाला लपून बसला. आंघोळ आयेपून ताताचार्य मंत्र पुटपुटत वर आले, पण पाहातात तर खडकावर घोतर-उपरणे काहीच नाहो! इकडे तिकडे जवळ पाहिले. लांब जाताही येईना की, कुणाला बोलावताही येईना तशा स्थितीत! काय
करावे? कते घरी जावे? ताताचार्य तर पार गोंधळून गेले! आणि भेदरूनही गेले! कारण अशा किनावस्त्र दिगंबर अवस्थेत स्नान करणे हे त्यांच्या वैष्णव धर्मांच्यादृष्टीने निषिद्ध होते. आणि ताताचार्य पडले राजगुरू!
तेनालीराम हे जाणून होता. त्याला ताताचार्यांची फजिती पाहून हसू येत होते. आणि त्याच्या दृष्टीने आपल्या अपमानाची भरपाई करुन घेण्याची व राजदर्शन कबूल करून घेण्याची होच संधी होती. म्हणून खडकाच्या आडूनच तेनालीराम म्हणाला, *ताताचार्य, धर्म सोडून वागता हे आता गावात जाऊन लोकांना आणि महाराजांना सांगू का?' लज्जेने व भीतीने थरथरत ताताचार्य म्हणाले,
'नको, नको. कोण आहे ते? माझे धोतर दे लक्कर.'
'देतो. पण एका अटीवर! '
'कोणती अट?'
'मला तुम्ही तुमच्या खांद्यावर बसवून राजरस्त्याने घेऊन गेले पाहिजे आणि मी राहातो त्या धर्मशाळेत सोडले पाहिजे. '
तेनालीरामची अट भलतीच मानहानी करणारो होतो, पण तो अमान्य करुनही त्यावेळी भागणारे नव्हते. बरे, वेळ दवडूनही उपयोग नव्हता. कारण आता चांगले उजाडू लागले होते आणिं नदीवर गावातले लोक येऊ लागले होते. रस्त्यावरची वर्दळही वाढली होती आणिं घराघरापुढे सडासंपार्जन होऊन रांगोळ्याही घातल्या जात होत्या...
'ताताचार्य, कबूल करता माझी अट की-' तेनालीरामने विचारले.
'ठीक आहे! ठीक आहे! बैस बाबा माझ्या खांद्यावर. मान्य आहे तुझी अट. पण आधी घोतर दे माझे.' ताताचार्यांनी गडबड चालविली.
मग तेनालीरामने त्यांच्याकडे धोतर फेकले. उपरणे दिले. त्यांची शालजोडी स्वत:च्या अंगावर घेतली आणि ताताचार्यांच्या खांद्यावर वढून वसला.
बिचारे ताताचार्य! निमूटपणे निघाले. राजमार्गावरील लोक हे दृश्य पाहून चकीतच झाले! राजगुरू ताताचार्य कुणा एका तरुणाला स्वत:च्या खांद्यावर घेऊन चालले आहेत हे दृश्य तसे राजनगरीतल्या लोकांना अपूर्व असेच होते! ज्याचा मान दुसऱ्याच्या खांद्यांवर असलेल्या पालस्थीतून मिरविण्याचा, इतकेच नव्हे तर ज्या नगरीतला राजा -सप्राट- राजगुरु म्हणून
ज्याच्याकडे पूज्यभाकनेने पाहातो, आदराने वंदन करतो, त्याच्या खांद्यावर कुणी एक तरुण बसाया! राजमार्गावरील लोकांची स्वाभाविक अशी समजूत झाली की, ज्या अर्थी राजगुरु ताताचार्यांनी एका तरुणाला आपल्या खांद्यावर घेतले आहे, त्या अथीं हा तरूण म्हणजे कुणी तरी श्रेष्ठ, अधिकारी, योगी, ज्ञानी पुरुष असावा!
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : Colors रंग
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon