वाचा रे वाचा! |
विकटकवी
पाचशे वर्षांपूर्वीची गोष्ट!
पंधराव्या शतकात बिरबलाचाच माऊबंद शोभेल अशी एक व्यक्ती होऊन गेली. बिरबल होता अकबर बादशहाच्या दरबारात त्याच्या नवरलांपैकी एक चातुर्यशिरोमणी म्हणून तशीच ही व्यक्ती होती क्जियनगरच्या कृष्णदेवरायच्या दरबारात घोट, चतुर, विनोदी, हजरजबाबी, आणि पंडित, कवी देखील असणाऱ्या या बहुगुणी व्यक्तीचं नाव होतं तेनालीराम!
तेनालीराम हे आपलं तसं प्रचारातलं, बोलण्या-वागण्यातलं नाव. तेनालीरामचं मूळ नाव होत रामलिंग. आंध्र राज्यातल्या कृष्णा नामक जिल्ह्यातला हा तेलगू ब्राह्मण. तेनाली किंवा तेआली हे त्याचं गाव. तेनालीचा रामलिंग म्हणजेच तेनालीराम. नावागावासहित प्रसिडध पावलेला. रामय्या आणि लक्ष्मम्मा ह्या गरिब पित्याच्या व मातेच्या पोटी तेनालीरामचा जन्म झाला होता. त्यामुळे त्याचे लाडप्यार तर तसे झालेच नाहोत, पण व्हावे तेव्हा धड, व्यवस्थित शिक्षणही झाले नाहो.
मग सोबत्यांबरोबर खुशाल गावभर भटकावे, खोड्या कराव्यात, थट्टा-मस्करी करावी, यातच बालपणातला बराच केळ गेला. पण तेनालीरामाला मूळचेच शहाणपण लाभलेले होते. त्याच्या खोड्यात आणि थट्टामस्करीतदेखील एक प्रकारची हुशारी असे. बुद्धिची चमक दिसे. असे म्हणतात प्रत्यक्ष कालिंकादेवीलाही स्वारीने आपल्या बुद्धिचातुर्याने प्रसन्न केले होते.
त्याची कथा अशी सांगतात की, एकदा एका संन्याशाने तेनालीरामाला रस्ताने वांडपणा करीत चाललेला असताना पाहिले. त्याच्या बोलण्या-चालण्यावरुन त्याची अक्कलहुशारीहो त्या चाणाक्ष संन्याशाच्या लक्षात आली. संन्याशाला त्याचे कौतुकही वाटले. वाईट अशासाठी वाटले की, एवढ्या तरुण, चुणचुणीत, हुशार मुलाची बुद्धिमत्ता आणि केळ व्यर्थवाया चाललेला आहे. त्याची निगा होत नाहो. संन्याशाला राहवले नाही. या मुलाच्या गुणाचे चोज करायचे या बुद्धीने तो तेनालीरामजवळ गेला आणि मोठ्या ममतेने त्याची क्चिरपूस केली. नाव-गाव विचारले, शिक्षण-धंद्याची चौकशी केली. नाव-गाव कळाले, पण शिक्षण-धंद्याच्या दृष्टीने आनंद होता!
संन्याशी म्हणाला, 'तेनालीरामा, माझं ऐकशील ?'
'काय सांगणार आहात?
'मंत्र!'
'मंत्र?'
'हं. एक मंत्र. '
'काय कह त्याचं?"
'हा मंत्र जपायचा. कालिकादेवीपुढे बसून. एका राओोत, तोन कोटी जप जपला पाहिजेस.'
'अशानं काय होईल?
'कालिकादेवी प्रसन्न होईल! '
'देवी काय देईल?"
'हवा तो वर देईल. तुझी इच्छा पूर्ण करील. '
तेनालीरामला आनंद झाला. घरच्या गरिबीला तो नाही तरी कंटाळलेलाच घेता!
'जपशोल मंत्र?' संन्याशाने विचारले.
'हो हो. अवश्य जपीन. सांगा सांगा तो मंत्र. ' तेनालीराम उतावीळपणाने म्हणाला.
'सांगतो हं. पण तेनालीरामा, एक गोष्ट मात्र विसरु नकोस बरं का!'
'कोणती गुरुमहाराज?'
'देवी दर्शन देईल त्यावेळी तिचे उप्र, भयंकर रूप पाहून घाबरून जाऊ नकोस. धीटपणाने निर्भय राहा.'
'नाही मिणार. नाही घाबरणार. ' तेनालीराम छातीवर हात ठेवीत म्हणाला.
मग संन्याशाने त्याला मंत्र सांगितला. तेनालीरामने तो मनोभावे ऐकला, आणि निष्ठेने त्या रात्री देवीपुढे बसून जपला. त्याची निष्ठा, भक्तिभाव पाहून देवी प्रसन्न झाली. सहस्त्रशोर्ष नि दोनच हस्त. त्यात खडण् ही आयुधं परिधान केलेली, कराल दृष्टीची आणि उप्र भयंकर पूर्ती प्रकट झाली! ते अद्भुत रुप पाहून कुणाचीही गाळणच उडाली असती. पण गुरुदेवांचा उपदेश आठवून तेनालीराम निर्भय राहिला. त्याने देवीला साष्टांग नमस्कार केला. तो देवीच्या कराल रूपाकडे पाहून याला, घाबरला तर नाहीच, पण 'खो खो खो' करुन हसायला लागला! काहो केल्या त्याला हसे आवरेना. तशी देवीच गोंधळून गेली आणि तिने त्याला क्तचिरले, 'बाळ, हसायला काय झालं?'
'मातुःश्री, आपण जगज्जननी आहात.' कसेबसे हसे आवरीत तेनालीराम म्हणाला, 'माझ्या हसण्याचं कारण ऐकून रागवाल
आपण, देवी बालकाला क्षमा करा. अभय द्या.'
'तेनालीरामा, तुला मी अभय देत आहे. सांग हसण्याचं कारण. घाबरू नकोस. ' देवी म्हणाली.
'मातुःश्री, आपल्याला पाहिलं. आपली हो हजार मुखं पाहिलो, आणि मनात विचार आला-'
'काय विचार आला? सांग. मिऊ नकोस.'
विचार असा आला, देवो; की आपल्याला- म्हणजे मला एक मुख आहे. म्हणजे एकच नाक आहे. पण तेवढे एकुलते एक नाकसुडा सर्दी झालो असता पुसण्यात, स्वच्छ ठेवण्यात किती तारांबळ उडते दोन हातांचो. आणि, देवी! तुला तर हजार नाकं आणि दोनच हात. तेहो हत्यारात गुंतलेले. मग हजार नाकांना पडसे झाले तर कसं काय करशील तू?'
तेनालीरामाचा हा विनोदी विचार ऐकून देवीदेखील खुदकन् हसली. खृष झाली. आणि प्रसन्नतेने तेनालीरामाच्या मस्तकावर वरदहस्त ठेऊन तो म्हणाली,
'तेनालीरामा, तुझ्या वाक्चातुर्यावर मी प्रसन्न आहे. तुझ्या अंगीच्या चातुर्यानं आणि क्निदशक््तीनं तू सर्वाच्या आदराला व प्रेताला पात्र ठठशोल. तुला राजदरबारी मानमान्यता मिळेल. 'विकटकवी' म्हणून तू ओळखला जाशोल. तुला अक्षयकीर्तीचा लाम होईल! '
'क्किरकवी!' तेनालीराम उद्गारला, 'वा! सुंदरच आहे नाव! आणि गंमतशीर!'ग॑
'गंमत कसली त्यात?' देवीने विचारले.
'देवी, 'वकिटकवी' सरळ वाचलं काय किंवा उलटं वाचलं काय, उजवीकडून वाचलं काय नि डावीकडून वाचलं काय, फरक व्हायचा नाही. तीच अक्षरं नि तेच नाव! ' तेनालीराम म्हणाला. त्याची ही हुशारी पाहून कालिकादेवी अधिकच प्रसन्न झाली. ती म्हणाली, 'तेनालीरामा, तुझ्या ठायीच्या गुणांचे चीज करणारा एकच राजा आहे आणि तो प्हणजे क्जियनगरचा राजा कृष्णदेवराय. त्याच्याकडे जा. तुझे कल्याण होईल. !'
तेनालीरामाच्यासंखंधी आणखीही एक आख्यायिका सांगतात ती अशी की, हा जन्मजातच विद्येचे धन घेऊन आलेला होता. रूढ पद्धतीने त्याचे शिक्षण झाले नसले तरी, बाराव्या वर्षीच हा तेलगू या आपल्या मातृभाषेत व संस्कृत या तत्कालीन प्रतिष्ठित पंडितांच्या भाषेत काव्यरचना करू लागला होता. तेलगू आणि संस्कृत या भाषांवर तेनालीरामने प्रभुत्व संपादन केले होते. त्याची लहान वयातली ही नवलपूर्ण विद्त्ता पाहून तेआलीचे लोक त्याला शंकराचा अवतारच मानू लागले होते. त्याचे आईवडील शैव होते. तेनालीरामही शिंवपूजक होता.
तेनालीरामची हुशारी पाहून अगदी तरूण वयातच व्यंकटपतीराम नामक चंद्रगिरीच्या राजाने त्याला आश्रय दिला होता असे प्हणतात. व्यंकटपतीराम हा वैष्णव पंथाचा अभिमानी होता. प्हणून तेनालीरामही वैष्णव बनला. त्याने आपले मूळचे रामलिंग हे नाव बदलून रामकृष्ण हे नवीन नाव धारण केले. काही असो. तेनालीराम म्हणूनच तो विख्यात झाला आणि विजयनगरच्या कृष्णदेवराय राजाच्या दरबारातील अष्टदिणजांपैकी तो एक झाला. तेनालीरामने लिहिलेला 'पाण्डुरंगमाहात्मय' नावाचा प्रंथही प्रसिदध आहे. त्यावरूनच कृष्णदेवरायाची त्याच्यावर मर्जी बसली होती.
राजा कृष्णदेवराय हा कर्नाटकातील विजयनगरच्या साप्राज्यातील एक रसिक, विद्वान; उदार असा गुणवंत सप्राट होऊन गेला. क्जियनगरचे साम्राज्य श्रीलंकेपासून उडोसापर्यंत पसरलेले होते. कृष्णदेवरायाच्या दरबारात शास्त्री, पंडित, कवी, कलावंत आदी गुणवानांचा सदैव सत्कार होत असे. तेलगू व कन्नड भाषाभाषी अनेक विद्वान राजाच्या राजसभेत होते. याच्या कारकिदींत तेलगू आणि कन्नड साहित्याची बरीच उन्नती झाली. तेनालीरामाच्या बुदधिचातुर्याचीही कृष्णदेवरायांनी उत्तम कदर केली.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : Baadh
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)
📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.
🔺️ इयत्ता १ली व २री
या गोष्टीतील चिमणीच्या पिलांचे पालकांच्या मदतीने चित्र काढून रंग द्या.
🔺️ इयत्ता ३री ते ५वी
तुम्ही पाहिलेल्या पुरस्थितीचे पालकांच्या मदतीने तुमच्या शब्दात वर्णन करा.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon