वाचा रे वाचा! |
जादूची विहीर
एकदा राजा कृष्णदेवरायने गृहमंत्र्यानां राज्यात खूप विहीरी बनविण्याचा आदेश दिला. उन्हाळा जवळ येत होता त्यामुळे राजाची अशी इच्छा होती की विहीरी लवकरात लवकर खोदल्या जाव्यात त्यामुळे राज्यातील लोकांना उन्हाळयात आराम मिळू शकतो.
गृहमंत्रींनी हया कामासाठी राज्याच्या तिजोरीतून खूप सारे धन घेतले, लवकरच राजाचा आदेशाप्रमाणे राज्यात विहीरी खोदल्या गेल्या. यानंतर राजाने एक दिवस राज्यात फेरफटका मारला व स्वतः काही विहीरीचे निरीक्षण केले व आपल्या आदेशाचे पालन पूर्ण झालेले बघून ते समाधानी झाले.
उन्हाळयाच्या एक दिवशी राज्याच्या बाहेर गावातील काही लोक तेनालीरामाकडे गेले, व ते सर्व गृहमंत्र्यांविरूध्द तक्रार घेऊन आलेले होते. तेनालीरामने त्या सर्वांची तक्रार ऐकून घेतली व त्यांना न्याय मिळविण्याचा मार्ग सांगितला.
दुसऱ्या दिवशी तेनालीराम राजाला भेटला व बोलला, ‘महाराज मला राज्यात काही चोर असल्याची माहिती मिळाली आहे, व ते आपल्या विहीरी चोरत आहेत.’
यावर राजा बोलला, ‘काय बोलत आहेस, तेनाली! कोणी चोर विहीर कसे काय चोरू शकतो?
‘महाराज ही गोष्ट आश्चर्यकारक जरूर आहे पण खरी आहे त्या चोरांनी आत्तापर्यंत बऱ्याच विहीरी चोरल्या आहेत.’ तेनालीराम शात स्वरात बोलला.
तेनालीरामचे हे बोलणे ऐकून दरबारातील सर्व उपस्थित दरबारी हसायला लागले.
महाराज बोलले ‘तेनालीराम तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तू आज असे काहीपण काय बोलत आहेस? तुझ्या बोलण्यावर कोणीच व्यक्ती विश्वास ठेवू शकणार नाही.’
'महाराज मला माहिती आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार, त्यामुळे काही गावकऱ्यांना माझ्या सोबत घेऊन आलो आहे. ते सर्व बाहेरच उभे आहेत. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना दरबारात बोलवून विचारू शकता, ते तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगतील.’
राजाने बाहेर उभ्या असलेल्या सर्व गावकऱ्यांना दरबारात बोलविले. त्यातला एक जण बोलला ‘महाराज गृहमंत्र्यांव्दारा बनविल्या गेलेल्या सर्व विहीरी गायब होत आहेत, तुम्ही प्रत्यक्ष बघु शकता.’
राजाने त्यांचे बोलणे ऐकले व लगेचच गृहमंत्री, तेनालीराम व काही गावकऱ्यांना बरोबर घेऊन विहीरीचे निरिक्षण करायला गेले. पूर्ण राज्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला असे जाणवले की राज्याच्या आसपास, गावातील अन्य ठिकाणी एकही विहीर नाही. राजाला हे समजल्याचे बघून गृहमंत्री घाबरला. सत्य स्थितीत त्याने फक्त काही विहीरी बनविण्याचे आदेश दिले होते व उरलेला सर्व पैसा त्याने आपल्या सुख सुविधासाठी ठेवून घेतला.
आत्तापर्यंत राजाला तेनालीरामाच्या बोलण्याचा अर्थ समजलेला होता. ते गृहमंत्र्यांवर रागवायला लागले, तेव्हा तेनालीराम मध्येच बोलला ‘महाराज, या सर्वामध्ये याची काहीही चूक नाही. वास्तवमध्ये सर्व विहीरी या जादूच्या होत्या ज्या बनल्यानंतर काही दिवसातच गायब झाल्या.’
आपले बोलणे संपवल्यानंतर तेनालीरामने गृहमंत्र्यांकडे बघितले, गृहमंत्र्याला आपण केलल्या कृत्याची लाज वाटली व त्याने आपली मान शरमेने खाली घातली.
त्यानंतर राजाने गृहमंत्र्याला फटकारले व नव्याने विहीरी बनविण्याचा आदेश दिला. हया कार्याची सर्व जबाबदारी तेनालीरामवर सोपविण्यात आली.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : माठ
📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.
🔺️ इयत्ता १ली व २री
तुम्ही तुमच्या आई-बाबांना कोणकोणती कामे करताना पाहिले आहे व तुम्ही त्यांना कोणकोणत्या कामात मदत करता हे सांगतानाचा व्हिडीओ करून पाठवा.
🔺️ इयत्ता ३री ते ५वी
साहिल आणि निगार प्रमाणे तुम्हाला सुद्धा कधी उंदीर दिसला आहे का व कुठे? त्यावेळी तुम्ही काय केलेत तुमचा अनुभव लिहा.
🎥 आजच्या गोष्टीचा खालील Video पहा व ऐका.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon