![]() |
वाचा रे वाचा! |
सगळयात जास्त चतुर कोण?
एक दिवस, बोलता बोलता राजा कृष्णदेव रायने तेनालीरामला विचारले ‘कोणत्या प्रकारचे लोक सगळयात जास्त मुर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात?’
तेनालीरामने त्वरीत उत्तर दिले ‘ब्राम्हण हे सगळयात जास्त मुर्ख असतात व व्यापारी हे सगळयात जास्त चतुर असतात.’
‘हे तू काय बोलत आहेस, तेनालीराम? ब्राम्हण हे उच्चशिक्षित व ज्ञानी असतात. तू व्यापाऱ्यांची ब्राम्हणांबरोबर तुलना कशी करू शकतो?’ राजा बोलला.
'महाराज! मी माझा मुद्दा पटवून देऊ शकतो.’ तेनालीराम बोलला.
'कसे?’ राजाने विचारले.
'मी उदया राजदरबारात सर्वांसमक्ष पटवून देईल.’
दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार पूर्ण भरलेला होता, तेव्हा तेनालीराम बोलला आपल्या अध्यात्मिक गुरूंना बोलवावे. राजगुरू आल्यावर तेनालीराम बोलला ‘मी हे आत्ता सिध्द करून दाखवेल महाराज, परंतु तुम्ही या कामात लक्ष देणार नाही असे मला वचन दया तेव्हा मी कामास सुरूवात करेन.’
राजाने तेनालीरामचे म्हणणे मान्य केले. तेनालीरामने आदरपूर्वक गुरूंना विचारले ‘राजगुरू, महाराजांना तुमच्या शेंडीची आवश्यकता आहे, याबद्दल तुम्हाला तुम्ही मागाल ते बक्षिस मिळेल.’
राजगुरूंनी विचार केला की इतक्या वर्षापासून जपलेली शेंडी कशी कापून दयावी? परंतु राजाची आज्ञा कशी टाळू शकतो. त्यांनी सांगितले ‘तेनालीरामजी, मी शेंडी कशी देऊ शकतो.’
तेनालीराम बोलला ‘राजगुरूजी, आपण आजन्म महाराजांचे मीठ खात आहात. शेंडी अशी वस्तु तर नाही ना, जी परत येऊ शकत नाही, आणि महाराज आपण मागाल ते बक्षिस दयायला पण तयार आहेत.’ राजगुरूंना मनातल्या मनात समजले की हा तेनालीरामचा काही तरी डाव आहे.
तेनालीरामने विचारले ‘राजगुरूजी, आपल्याला शेंडीच्या बदल्यात काय बक्षिस पाहिजे?’
राजगुरूंने सांगितले की ‘पाच सुवर्ण मुद्रा खूप होतील.’
पाच सुवर्णमुद्रा राजगुरूंना दिल्या गेल्या आणि केशकर्तन करणाऱ्याला बोलवून राजगुरूंची शेंडी कापण्यात आली.
आता तेनालीरामने राज्यातील सर्वात प्रसिध्द व्यापाराला बोलविले.
तेनालीरामने व्यापाराला सांगितले ‘महाराजांना तुमच्या शेंडीची गरज आहे.’
'सर्व काही महाराजांचेच आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी एक गरीब माणूस आहे.’ व्यापारी बोलला.
‘तुम्हाला तुमच्या शेंडीची मागाल ती किंमत दिली जाईल.’ तेनालीराम बोलला.
'सर्वकाही तुमची कृपा आहे परंतु....’ व्यापारी बोलला.
'तू काय बोलू इच्छितो?’ तेनालीरामने विचारले.
खरे तर, या शेंडीमुळे मी सर्व काही व्यवस्थापित करू शकतो. माझ्या मुलीचा विवाह केला होता तेव्हा मी माझ्या शेंडीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पूर्ण पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हापण याच कारणामुळे पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. माझ्या या गोंडस शेंडीमुळे बाजारात जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कमीत कमी दहा ते बारा हजार सुवर्ण मुद्रा उधार मिळतात.’ आपल्या शेंडीवर हात फिरवत व्यापारी बोलला.
या प्रकारे तुमच्या शेंडीची किंमत पंधरा हजार सुवर्ण मुद्रा झाली आहे. ठिक आहे! तुला तुझी ही किंमत दिली जाईल.’
पंधरा हजार सुवर्णमुद्रा व्यापाराला दिल्या गेल्या व व्यापारी शेंडी कापण्यासाठी बसला. जसे न्हाव्याने शेंडीजवळ वस्तारा नेला, व्यापारी जोरात बोलला ‘सांभाळून न्हाव्या, तुला माहित नाही का ही महाराज कृष्णदेवराय यांची शेंडी आहे ते.’
हे ऐकून राज चिडला व बोलला, ‘या व्यापाऱ्याची इतकी हिंमत की तो माझा अपमान करतो? त्याला धक्के मारून दरबारातून काढून टाका.’
व्यापारी पंधरा हजार सुवर्ण मुद्रांची थैली घेऊन तिथून निघून गेला.
काही वेळानंतर तेनालीराम बोलला, ‘आपण बघतले का महाराज, राजगुरूंनी पाच सुवर्णमुद्रा घेवून आपली शेंडी कापून दिली व व्यापारी पंधरा हजार सुवर्णमुद्रा घेवून गेला त्याचबरोबर आपली शेंडीही वाचवून घेऊन गेला. तुम्हीच सांगा, ब्राम्हण चतुर की व्यापारी?’
राजा बोलला ‘तू योग्य सांगितले होते, की व्यापारी चतुर असतात.’
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : Baadh
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)
📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.
🔺️ इयत्ता १ली व २री
या गोष्टीतील चिमणीच्या पिलांचे पालकांच्या मदतीने चित्र काढून रंग द्या.
🔺️ इयत्ता ३री ते ५वी
तुम्ही पाहिलेल्या पुरस्थितीचे पालकांच्या मदतीने तुमच्या शब्दात वर्णन करा.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon