सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 18दि.16/08/2021

वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       सोमवार दि.16/08/2021

माकड आणि मासा

 एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले. तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे. म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्‍याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले, 'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?'

माकडाने सांगितले, 'मी मुंबईचा?'

माशाने पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे' आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले, 'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'

या मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले. त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.

तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या  कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती.  धन्यवाद!

आज पाठवलेल्या पुस्तकावर खाली प्रश्न दिले आहेत तुमच्या इयत्तेनुसार जी activity दिली गेली आहे ती करून ग्रुपवर पाठवा.

१ली व 2री -  कुल्फीचे चित्र काढून त्यात रंग भरा.

३री ते ५वी - तुमच्या घरात असणाऱ्या साहित्यापासून/ मातीपासून पालकांच्या मदतीने गल्ला तयार करा व त्याचा फोटो काढून ग्रुपवर पाठवा.

📕 आजच्या गोष्टीचे नाव : Money For Ice-cream 

📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)

THANKS FOR VISIT 
Previous
Next Post »