वाचा रे वाचा! |
लांडगा आणि कोकरू
एकदा एका मेंढ्यांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते. ते पाहून एक लांडगा त्याच्या पाठीमागे लागला. याच्या हातून आपण सुटत नाही असे लक्षात येताच कोकरू लांडग्याला हसत म्हणाले, 'अरे, तू मला ठार मारणार हे मला माहितच आहे पण निदान आनंदानं तरी मरावं असं मला वाटतं. तेव्हा तू जर मुरली मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.' ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला. त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला.
मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकताच जवळच असलेले कुत्रे धावत आले. त्याला पाहताच लांडगा घाबरून पळू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला, 'आपला धंदा सोडून भलत्याच धंद्यात पडल्याने असं झालं.' 'माझा खाटकाचा धंदा सोडून मी वाजंत्र्याचं काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !'
तात्पर्य - नादी मनुष्याला, चतुर लोक सहज फसवू शकतात.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.
आज व्हिडीओ बुक 'घर' पाठविणार आहोत. त्यावरील पूरक उपक्रम...
🔺️ इयत्ता १ली व २री
तुम्हांला माहीत असलेल्या प्राण्यांची नावे व त्यांच्या घरांची नावे पालकांच्या मदतीने लिहा.
🔺️ इयत्ता ३री ते ५वी
आपण कोणकोणत्या प्रकारच्या घरात राहतो त्यांची नावे लिहून चित्र सुद्धा काढू शकता.
📕 आजच्या गोष्टीचे नाव :घर
खालील गोष्टीचा Video पहा व ऐका.
ConversionConversion EmoticonEmoticon