वाचा रे वाचा! |
पाणबुडा पक्षी
पाणबुडा नावाचा पक्षी पाण्यात उड्या मारून मासे पकडून खातो. एका पाणबुड्याने आपण पारध्याच्या हाती सापडू नये म्हणून आपले घरटे नदीकाठच्या झाडावर बांधले होते. एके दिवशी तो पक्षी बाहेर गेला असता नदीला पूर आला आणि पाणि चढून घरटे पिलांसकट वाहून गेले. परत आल्यावर पक्षी पाहातो तर घरटे व पिले दोन्ही नाहीशी झालेली.
ते पाहून तो म्हणाला, "एका शत्रूला वाचविण्यासाठी मी येथे येऊन राहिलो, तोच दुसर्या शत्रूच्या तडाख्यात सापडलो.
तात्पर्य - एका संकटातून सुटण्याच्या प्रयत्नात कधी दुसरेच संकट उभे राहाते.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
मुलांनो,आज तुम्हांला छान गोष्ट पाठवली आहे ती ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा. गोष्टीच्या शेवटी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर लिहून ग्रुपमध्ये पाठवा. तसेच तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना भावंडांना व मित्र-मैत्रिणींना देखील गोष्ट ऐकवा...
FLIPBOOK स्वरूपात गोष्ट वाचा.
(पुस्तकाचे पान बोटाने उलटवतो तसे पान उलटवा.)
आजची गोष्ट Pets and Pests वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon