सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Roshani Meshram एक भारत श्रेष्ठ भारत

 

एक भारत श्रेष्ठ भारत


माझ्या देशाची तुम्मा
काय सांगू बात
सर्वगुण घेऊन बनला
माझा देश जगात

विविध भाषा, विविध धर्म
सर्वाना अभिमान असे देशाचा
तिरंगा आपुला प्यारा
15ऑगस्ट दिवस स्वातंत्र्याचा

सर्व जातिपंथीय लोक
पण संविधानाने शिकवले
हिंदूंचा ह मुसलमानांचा म
यातूनच हम शब्द दिसले

हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई
मिळून राहती भावापरी
आपली आई भारत माता
सर्वस्व अर्पिती तिच्या वरी

सैनिक म्हणून लढताना
परवा न तो जीवाची करी
म्हणतसे शाहिद झालो जरी
येईन परत या भारत भूमीवरी

कु रोशनी सहदेव मेश्राम (उच्च मा. शी )
रमाई आदिवासी आश्रम शाळा बाणगाव
ता .नेर जि यवतमाळ 445102
Previous
Next Post »