एक भारत श्रेष्ठ भारत
माझा भारत महान
किती गाऊ गौरव गान
एकता हिच आमुची शान
हिमशिखरी फडके तिरंगा महान.
वेगवेगळ्या भाषा किती
वेशभूषा अन वेगळ्या जाती
तरीही एकमताने नांदती
एकाच जोशात मिरवीती.
चर्च, मस्जित अन मंदिरे
एका ईशाची महती गाती
गीता,बायबल,कुराण मानवा
जगण्याचे तत्व सांगती.
जिथे आईला देवी म्हणती
हुतात्म्याची महती गाती
आनंदाचे प्रेमाचे वानही देती
सौख्यच्या सागरास सदैव भरती.
ऋषीं मुनींना सदा वंदिती
दिन दुबळ्याची झोळी भरती
आज्ञानाला ज्ञानाचा प्रकाश दाविती
शौर्याची गीते भारत भु चा डंका वाजवती.
अशी माझी माता भारती
तुझे काव्यमय कौतुक करू किती
साऱ्या जगात वाढली कीर्ती
मीरा आळवी तुज घेऊन पंचारती.
सौ. मीरा दिगंबरराव फावडे.
प्रा. शिक्षिका(इटाळी )
ता.मानवत
जि. परभणी.
ConversionConversion EmoticonEmoticon