मी भारत देश बोलतोय!
मी भारत मी इंडिया
मीच हिंदुस्तान
किती आले किती गेले
तरीही आहे मीच महान
होता एक काळ
जुलमी इंग्रजांचा
होरपळून मी निघालो
छळ पाहुन लेकरांचा
कुणी गेले फासावरती
कुणी सडले तुरुंगात
मिळविण्या स्वातंत्र्य
उड्या घेतल्या हवनात
नाही मला भीती परकियांची
वाटते ती स्वकियांची
स्वार्थापोटी करतील सौदा
चाड नाही उरली कुणाची
संकट येता व्हायरसचे
झाले सज्ज योद्धे
एकजुटलली माझी बाळे
जिंकण्या धुर्दर युद्धे
दयाराम रामदास पाटील
मु. पो. तालुका- अलिबाग,
जिल्हा -रायगड, महाराष्ट्र.
ConversionConversion EmoticonEmoticon