प्रवासी एकतेचा
वाटसरू मी दिंगताचा....
इच्छा अन् आकांक्षा !
पुरून उरली,
सरून मेली.
शोध नव्या भूमिचा...
पाषाणावरती घाव पडावा
क्रांतिपर्व तंञ अविष्कारांचा
क्षणा-क्षणाचा शोध नवा
मानव क्रांती ज्योतीचा....
वाटसरू मी दिगंताचा....
छंद मला जोडण्याचा.
आशा-रूपरेषांचा
सिमारेषांच्या ना मर्यादीचा...
जिथे थांबावे.,
भ्रांत विश्रांती संयमीचा.
मुलूख जोडावा.
चोहू कानोसा जातींचा....
जात-धर्मच्या वाटेवरती,
ना कुणी यावा?
धर्मशाळेच्या कुंडणखान्यात
धर्म व्देष ना व्हावा...
शोध नव्या भूमिचा
जलचक्राच्या राशीमध्ये.,
पुनःच्छ मानवजात बांधण्याचा.
श्री.सोमनाथ दिनकर पाटील
मु.पो.कामेरी ता.वाळवा जि.सांगली
राज्य.महाराष्ट्र
ConversionConversion EmoticonEmoticon