देशभक्ती
तोडुनि शृंखला पारतंत्र्याच्यालाखों वीरांनी केलें बलिदान
असा माझा भारतदेश महान
इथे जन्मलेंत शूर वीर जवान
उचलूनिच विडा देशभक्तांनी
स्वातंत्र्याचे झेललेय आव्हान
पत्करले हौतात्म्य देऊन प्राण
असा माझा भारत देश महान
गंगा यमुना कृष्णा गोदावरी
नद्यांचे पवित्र जल पिऊनी
वाहते सहिष्णुता नि ममत्व
परदेशी पाहतो इथे येऊनी
बापूजी चाचा वीर विनायक
सुभाषबाबू आणि भगतसिंग
खवळून उठले हेच देशसेवक
वाजवी युद्धाचे तेही रणशिंग
करूनीच स्वतंत्र भारतभूला
सलाम माझा असे या वीरांना
त्यागूनि काया ते वीरगतीला
स्मरूनि त्यांच्या थोर कार्यांना
सौ. भारती सावंत,मुंबई
ConversionConversion EmoticonEmoticon