माझा भारत देश
स्वतंत्र माझा भारत देश
अभिमानाने छाती फुलते
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने
भारतमातेची शान वाढते
संस्काराच्या समृद्धीची
वाट सदा ही बहरते
तीनही लोकात याची
कीर्ती सतत पसरते
बंधु-भगिनी घोष ईथला
जगात सा-या दुमदुमला
संस्कृतीचा ईथला डंका
विश्वलोकात असा घुमला
कामी आले रक्त वीरांचे
स्वातंत्र्य मिळाले भारताला
तनमन हे पुलकीत झाले
त्या सुंदर पावन समयाला
प्रणाम तुजला हे माते
स्विकार या पामराचा
मान अशीच उंच राखतो
प्रयत्न सतत तो राखण्याचा
कवयित्री श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जि. कोल्हापूर
ConversionConversion EmoticonEmoticon