सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

प्रीती रत्नपारखी : एक पाऊल

 

एक पाऊल

एक पाऊल तेजाकडे,

मोरपंखी भारताचे लक्ष ध्येयाकडे,


पारतंत्र्याच्या बेड्या उखडुन,

स्वातंत्र्याच्या स्वतंत्र जीवनात,

अमूल्य जीवन देणाऱ्या,

महापुरुषांना प्रणाम.....


रक्ताच्या थेंबांची पर्वा न करता,

जीवाची पर्वा न करता,

जातीभेद,वर्णभेद न करता,

जीवाचे रान करणाऱ्या 

महापुरुषांना प्रणाम......


नवनवीन संकल्पांचा ध्यास,

प्रगतीपथाची सुरेख वाट,

जगाच्या पाठीवर अव्वल स्थान,

असा माझा भारत ,श्रेष्ठ भारत.......


बंधुभावाची जपवणूक,

स्त्री मध्ये ममत्व ,

पावित्र्य जपणारा,

असा माझा भारत,श्रेष्ठ भारत......


एक पाऊल तेजाकडे,

मोरपंखी भारताचे लक्ष्य ध्येयाकडे.......


रत्नपारखी प्रीती प्रकाश,धुळे

Previous
Next Post »