सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

प्रसाद कोचरेकर : देशभक्ती

 

देशभक्ती

भारतमाते तुझिया चरणी,

होऊनि नत मी तुझिया धरणी

करितो जयजयकारा,

देशभक्त हो सलाम तुम्हा,

असेल अमुचा नारा ।। १।।


आठवुनी त्या भगत राजगुरू,

सुखदेव या सम क्रांतीवीरा

सावरकर अन चाफेकर

हे बंधु निर्भयतेने करिती ललकारा ।।२।।


नेताजींचा कदम बढाओ मंत्र गातसे वारा

ध्वज तिरंगा हाती घेई मादाम कामा न्यारा

प्रीतीलता उषा वीणा अरूणा

पेटून उठती घेऊनी हाती ज्वाला ।।3 ।।


इंग्रजांस त्या जाब विचारी टिळकांचा हा बाणा

मायभूमीला साद घालतो विनायका रणवीरा

बाबू गेनू अनंत अन चाफेकर बंधु

प्राण घेऊनी तळ हातावर निर्भय हे शूरवीरा ।।४।।


शांतीचा संदेश देतसे नेहरु या देशाला

सत्य अहिंसेचा पाढा गिरवी गांधीजींचा चेला

अनेक वीरांसवें वीरांगना

देती झोकुनी देशभक्तीच्या प्रेमा ।।५।।


धन्य असे मी भारतमाते

देशभक्तीचे बीज आम्हांते

लाभत आहे अमरवीरांच्या बलिदानातुनी

देई न शत्रूला थारा ।।६।।


रचना : श्री प्रसाद यशवंत कोचरेकर

विलेपार्ले पूर्व,मुंबई ९९

व्हॉट्सअप नंबर ९८१९२८६००४

ई-मेल आयडी : prasadyk24@gmail.com

Previous
Next Post »