विश्वाची शान, भारत देश महान
साऱ्या विश्वाची शान, माझा भारत देश महान
माझा भारत देश महान, माझा भारत देश महान..
जन्मा आले शिवबा, तानाजी, बाजी, रायबा.
रयतेला सुखी करण्या, खड्ग हाती घेती शिवबा
मुघलांची दाणादाण, केले स्वराज्य महान.
ही नररत्नांची खाण, माझा भारत देश महान...१
टिळक, गांधी, आगरकर, कीर्तिवंत आंबेडकर
भगतसिंग, चाफेकर स्वातंत्र्यवीर सावरकर.
शूरवीर उदयास आले, ब्रिटिशांना बेजार केले.
साऱ्या धर्माची ही शान माझा भारत देश महान.२
राष्ट्रगीत आम्हा अभिमान वंदेमातरम् राष्ट्रीय गान.
राष्ट्रभक्तीचा सन्मान, अखंड सारा हिंदुस्थान.
गीता बायबल अन् कुराण, ग्रंथसाहीब देती ज्ञान.
अनेकतेतून एकसमान, माझा भारत देश महान.३
श्री.प्रशांत महादेव कोळी
रा. जि. प. प्राथ. शाळा- खोपटे
ता. उरण, जि. रायगड.
ConversionConversion EmoticonEmoticon