माझा भारत
माझा भारत आहे महान
गातो आम्ही स्वातंत्र्याचे गान ॥धृ.॥
लाभला अनमोल वारसा
भूमीला पवित्र संस्कारांचा
नामदेव,ज्ञानेश्वर,तुकाबो
संतांच्या शिकवणीचा॥१॥
भारत भूमीच्या शिरी
हिमालयाचा मुकूट छान
रक्षण करण्या सदा तत्पर
उत्तुंग हिमशिखरे महान॥२॥
गंगा,यमूना,गोमती
दुथडी भरून वाहती
विशाल सागरलाटा उसळूनी
भूमीस पवित्र स्नान घालिती॥३॥
शिवाजी,अहिल्या,लक्ष्मीबाई
भारत भूमीत जन्मले
शौर्याने वीर लढले
रणांगनी पावन झाले॥४॥
समता,बंधूता,विश्वशांती
जागवी भारतीयांचा राष्ट्राभिमान
विविधतेतून एकता नांदते
माझ्या भारताची शान॥५॥
दिपाली राहुल लोखंडे
मु.पो.भिगवण ता.इंदापूर जि.पुणे
ConversionConversion EmoticonEmoticon