वीर पुत्र मातृभूमीचा
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एक वीर भेटला
डोळे भरून पाहून त्यास छातीठोक सलाम केला.....
व त्याच्याशी हितगुज केलं आणि म्हणालो ....
"तू आहेस म्हणून सुरक्षितता आहे
अंधाराच्या सोबतीला प्रकाशाची वाट आहे
तू इंचभरही मागे सरत नाहीस म्हणून आम्ही
आयुष्यात पुढे सरसावत आहोत."
त्यावर त्या वीराचे शूर उत्तर....
"भारत मातेच्या रक्षणा खातर
प्राणपणास आम्ही ही लावतो
ज्योतीप्रमाणे जळून
मशाली होऊन उठतो
बलिदान शुर वीरांचे
नेहमीच आम्ही आठवतो
नित्य आम्ही तिरंगा
सीमेवर फडकवत ठेवितो
याचसाठी भारत मातेच्या
पोटी जन्मास येतो
मातेच्याच रक्षणा खातर
मातेच्याच कुशीत मिसळतो
चेहऱ्यावर विजयी भाव
तसाच राहून जातो
तो पाहून दुश्मनही
भिऊन पळून जातो
असा माझ्या भारत मातेसाठी
एक वीर होऊन जातो
त्याचे आठवून शौर्य
आम्ही सारे पेटूनी उठतो
मग दुश्मनांचे दणाणून धाबे
मैदान आम्ही गाजवितो
भारत मातेचे ऋण चुकवीत
एक दिवस आम्हीही प्राण सोडतो.
- pranshu Pedgaonkar ,
Parbhani, Maharashtra.
ConversionConversion EmoticonEmoticon