सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Raju Gadhire भारतमाता

भारतमाता

भाग्यवान समजतो
एक भारत श्रेष्ठ भारतभूमीत जन्मलो
अनेक धर्म,जाती,पंथ,
भिन्न पोशाख,प्रांत,भाषा
विविधता पण एकात्मता
सर्वांना प्रिय भारतमाता।।१

शूरवीर,क्रांतिकारक,स्वातंत्र्यवीर
मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग
करणाऱ्या देशभक्तांचा देश
विश्व बंधुत्व,विश्वची माझे घर
जगाला प्रेम अर्पावे
सत्य,अहिंसा,संयम सहिष्णुता
आदर्श संस्कृती,स्वआत्म जागृती
विश्वशांती,मानवता,एकत्वतेचा मंत्र देणाऱ्या 
संत,महात्मा,ऋषीमुनी
महान साहित्यिक,विचारवंताचा
मार्गदर्शक भारत एक महान देश।।३

निसर्ग समृद्ध साधन संपत्ती
सत्तेसाठी समृध्द भारतभूमी
विश्वाला हावीशी वाटत होती
परस्परात सतत युद्ध करून
एकमेकांना हरवून जिंकत होती
अनेक वर्षे राज्य करून
संपत्ती घेऊन जात होती
तरीही संपत्ती संपत नव्हती
पृथ्वीवर ऐकमवं भारतभूमी।।४

स्वरचित
गडहिरे राजू तुळशीराम
9819532264
कल्याण पश्चिम, ठाणे 421301
व्हाट्सअप 9819532264

Previous
Next Post »