एक भारत श्रेष्ठ भारत
एकतेची अन् अखंडतेची
मानवतेच्या धर्माची I
कला , संस्कृती अन् साहित्याची
अध्यात्म अन् राष्ट्रप्रेमाची I
भारत माता अमुचि माता
प्रणाम करिते या भूमाता I
रामायण अन् महाभारताची
वेद अन् स्मृती पुराणांची I
तमसो मा ज्योतिर्गमय श्लोकाची
ओढ आम्हास या प्रार्थनेची I
श्रेष्ठतेचा मंत्र जपूया
शूरवीरांची गाथा गाऊया I
भाषा अनेक , प्रांत अनेक जरी
दर्शन घडते विविधतेतून एकतेचे परि I
राष्ट्रध्वज अन् राजमुद्रा , सत्यमेव जयतेचा
सन्मान करूया राष्ट्रीय प्रतिकांचा I
तमोगुणाला झटकुनी आस धरूया प्रगतीची
कास धरूया विज्ञान अन् श्रमप्रतिष्ठेची I
असा अमुचा एक भारत
सर्व जगात श्रेष्ठ भारत I
कवियित्री : सौ.प्रज्ञा प्रवीण धांदरुत.
गाव - चेंबूर
तालुका - कुर्ला
जिल्हा - मुंबई उपनगर
ConversionConversion EmoticonEmoticon