माझी देशभक्ती
थोर संताची जन्मभूमी
जन्मले धाडसी शूर राजे
अभिमान मजला देशाचा
साऱ्या जगात किर्ती गाजे
देऊन बलिदान देशासाठी
स्वतंत्र करून घेतला देश
नांदती गुण्यागोविंदाने जरी
अनेक भाषा अनेक वेष
याच मातीत घेतला जन्म
या मातीचा राखते मान
ऋण फेडण्यास या देशाचे
भारतीय करतात जीवाचे रान
देशाची प्रगती करण्यास
शिक्षण देते बालकांना
हिच खरी माझी देशभक्ती
नवीन आकार घडविताना
सुशिक्षित असावी भावी पिढी
बेकारी दारिद्रय व्हावे दूर
प्रयत्न आम्हा सर्व बांधवाचे
शिक्षण आमुचे एकच सुर
आलीयागोहर जाकीर शेख, धुळे
ConversionConversion EmoticonEmoticon