सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Prapti Ghade स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी

 

स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी


स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी
भारताच्या प्रगतीसाठी
प्राण सोडले भगतसिंगांनी
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ||१||

देशसेवा करूनी
प्राण दिले देशासाठी
म.गांधी नाव त्यांचे
उध्दारक ते ठरले ||२||

स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी
झगडले झुंजले जनता
प्राणाची आहुती देऊन
सिद्ध केली तयानी राष्ट्रसेवा ||३||


सीमेवरती लढतो लढता
प्राण सोडले या वीरांनी
मातृभूमीच्या आदर्शाचा
अभिमान ठेवला त्यांनी ||४||

सीमेवरती बंदुकांनी
छेदले ते तरुण
मरण पावले ते ही सारे
अजरामर होऊन ||५||

कोणी हिंदू वा मुसलमान
कोणी शिख वा बौद्ध असो
अभिमान मला हा की
मी भारतीय आहे ||६||

नाव - प्राप्ती चंद्रकांत घाडे
इयत्ता - सातवी
शाळा - जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाभरे
गाव - पाभरे खुर्द
पोस्ट - कुटगिरी
तालुका - गुहागर
जिल्हा - रत्नागिरी
_______________________________________



Previous
Next Post »