सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Pradnya Wagha एक भारत श्रेष्ठ भारत बनवूया

एक भारत श्रेष्ठ भारत बनवूया


एक भारत श्रेष्ठ भारत बनवूया
चला देशासाठी बलिदान देऊया ||धृ||

जे जवान भारतमातेसाठी लढले |
ते देशासाठी अमर हुतात्मे झाले ||
घेऊनी हाती दीप वीर श्लोक म्हणुया ||1||

पूर्वज इतिहास होता पराक्रमाचा |
हा इतिहास आपुला अभिमानाचा ||
या भारतात अभिमानाने जगुया ||2||

हा इतिहास ही संस्कृती आपुली शान |
यांचा करूया आपण सन्मान ||
सारे मिळून प्रिय संस्कृती जपूया ||3||

भारत मातेने आम्हा घडविले |
थोर हुतात्म्यांनी शिकविले ||
समाजात या एकजुटीने राहूया ||4||

अति मौल्यवान आपली धरती |
जशी चमचम हिरे-मोती ||
चला हो जागृत होऊ या ||5||

महान आपुला भारत देश |
नाही तयामध्ये कुठला दोष ||
हा श्रेष्ठ भारत आपला बनवूया ||6||

तिरंगा नभात चमचमतो |
धाडस आमुचे वाढवतो ||
तिरंगा आनंदाने फडकवूया ||7||

कवायत्री प्रज्ञा दत्तात्रय वाघ
मु.पो.:- रांजणी, तालुका :-आंबेगाव
जिल्हा:- पुणे 410504
Previous
Next Post »