भारत देश महान
भारत देश महान,अमुचा भारत देश महान
हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई
आम्ही सारे भाई भाई.
जातीभेद नसे आम्ही गातसे
साऱ्यांचे गुणगान
भारत देश महान
अमुचा भारत देश महान ||१||
आम्ही मावळे शिवरायांचे
त्यांच्या चरणी सर्वस्वाचे
करतो आम्ही बलिदान
भारत देश महान
अमुचा भारत देश महान||२||
गंगा माता अमुची माता
तिच्या चरणी झुकवू माथा
गंगेच्या या पावन कार्या
आम्ही सारे झटणार
भारत देश महान
अमुचा भारत देश महान
भारत देश महान
अमुचा भारत देश महान ||३||
स्मिता अनंत राऊत
मुंबई उपनगर
ConversionConversion EmoticonEmoticon