सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Arpita Gharpure भारत माझा देश

 

भारत माझा देश

भिन्न भाषा, भिन्न जाती, भिन्न आमुचे वेश
एक भारत श्रेष्ठ भारत भारत माझा देश !

थोर क्रांतीवीरांनी भारतभूसाठी प्राण वेचले
बापूजी फुल्यांनी शिकविले सत्य अहिंसेचे धडे
जराही नसे त्या वीरांना अहंकाराचा लवलेश
एक भारत श्रेष्ठ भारत भारत माझा देश !

परकीयांच्या जोखडातून भारत आपुला मुक्त केला
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्याचा सोहळा रंगला
भारतभूच्या स्वातंत्र्यवीरांनी किती सोसले क्लेश
एक भारत श्रेष्ठ भारत भारत माझा देश !

आमुचा तिरंगा आमुची शान
राष्ट्रगीताला आमच्या जगात असे मान
संस्कृती परंपरा टिकवतो इथे प्रत्येक राज्याचा वेश
एक भारत श्रेष्ठ भारत भारत माझा देश !

सौ अर्पिता हेरंब घारपुरे
उपशिक्षिका
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ संचालित
आठवले जोशी बाल विकास मंदिर ,नाशिक
तालुका जिल्हा नाशिक
Previous
Next Post »