जाहला अमृत स्पर्श
भारताचा आहे आम्हास गर्व
वैविध्यपूर्ण भौगोलिकता सर्व
विविध भाषा विविध धर्म
एकोपा जपणे हेच मर्म
येथे संत महंतांचा जन्म
मुख्य व्यवसाय कृषिसंवर्धन
वेगळेपणा दावि संस्कृती संवर्ग
काश्मिर असे भारतातील स्वर्ग
साधली प्रगती अन् उत्कर्ष
स्वातंत्र्याचे झाले वयवर्षे
पंच्याहत्तरी ने दिधले हर्ष
जाहला अमृतमय स्पर्श
संविधानाचा जाणून घ्या अर्थ
वास्तू ,स्तूप जपा दुर्ग
लोकशाहीचा अभिमान सार्थ
आत्मनिर्भर भारतीय समर्थ.
कवयित्री दर्शना दीपक चव्हाण
शाळा - टागोर नगर म्युनिसिपल मराठी शाळा नंबर 1
विक्रोळी पूर्व ,मुंबई उपनगर.
विभाग - एस
ConversionConversion EmoticonEmoticon