सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Yogita Kothekar अमुचा भारत देश

 

अमुचा भारत देश

छान छान छान अमुचा देश किती छान
आम्ही भारतवासी, ऋषीची संतान
छान छान छान अमुचा देश किती ॥धृ॥

देश आमुचा शिवरायांचा
झाशीवाल्या रणराणीचा
इथे जन्मले गांधी ,नेहरू
टिळक पुण्यवान ॥ १॥
छान छान छान आमचा देश किती छान

या मातीतून गंगा वाहे
उंच हिमालय अजिंक्य आहे
सह्याद्रीच्या कडेकपारी
घुमतो विजयगान ॥ २॥
छान छान छान आमचा देश किती छान

माणुसकीवर आमची भक्ती
एकीचे बळ इथली शक्ती
साधुसंत हेच सांगती
ठेवून त्यांचा मान ॥ 3॥
छान छान छान अमुचा देश किती

जिंकावे वा लढूनी मरावे
भारतीयांना एकच ठावे
देशभक्तीचे गाणे गावे
ठेवूनी उंच निशाण ॥ ४॥
छान छान छान आमचा देश किती छान

नवीन आशा , नव्या योजना
नवीन स्वप्ने , नव्या कल्पना
नवे ज्ञान, विज्ञान घेवुनी
घडवू देश महान ॥ ५॥
छान छान आमचा देश किती छान

आम्ही भारतवासी, ऋषीची संतान
छान छान छान अमुचा देश किती छान ॥

सौ .कोठेकर योगिता संजय
निगडी पुणे
Previous
Next Post »