दैनिक परिपाठ
22 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्विकारा.
🔺️ दिनविशेष
१९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला
१९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
२००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : ठसा उमटवणे-अर्थ : छाप पाडणे.
▪️वाक्य : प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या भाषणाचा श्रोत्यांवर ठसा उमटवला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : रोज मरे त्याला कोण रडे
▪️अर्थ : रोजच्या होणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे.
🔺️ कोडे
▪️ सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ?
▪️उत्तर - वाणी
🔺️ सामान्यज्ञान
१) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?
उत्तर - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्
२) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता
आहे ?
उत्तर - अंटार्टिक ब्ल्यू व्हेल
३)जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती
आहे ?
उत्तर - बुर्ज खलिफा
४) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे
कोणती आहे ?
उत्तर - जपानमधील बुलेट ट्रेन
५) जगातील सर्वात कमी लोकसंख्या
असणारा देश कोणता आहे ?
उत्तर - व्हॅटिकन सिटी
🔺️ बोधकथा
प्रामाणिक लाकूडतोड्या
एका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदी जवळ एक मोठे झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कु-हाड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो.त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाठी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते, "का रे? का रडत आहेस तू ?' लाकूडतोड्या सरीतादेवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबदल सांगतो.
सरीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते. ती लाकूडतोड्याला दाखवते.लाकुडतोड्या नम्रपणे म्हणतो, "देवी, ही माझी कुऱ्हाड नाही."
मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते.पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो,ही देखील नाही. नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते.लाकुडतोड्या म्हणतो, "होय. हीच माझी कुऱ्हाड आहे माता!'
देवी म्हणते, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव. प्रामाणिकपणा मोठेच बक्षीस मिळवून देतो.
तात्पर्य - नेहमी खरे बोलावे.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon