दैनिक परिपाठ
14 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.
🔺️ दिनविशेष
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : छाननी करणे - अर्थ : तपास करणे.
▪️वाक्य : अतिरेकी कोणत्या जागी लपले आहेत, याची पोलिसांनी प्रथम छाननी केली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : दुष्काळात तेरावा महिना
▪️अर्थ : एक संकट अस्ताणे अजून संकट येणे.
🔺️ कोडे
▪️ व स्या अ मा री ठो पि कोणता सण ?
▪️उत्तर - पिठोरी अमावास्या
🔺️ सामान्यज्ञान
१) आयपीएलमध्ये खेळणारा पहिला
अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान
२) एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी
३) भारतात लसीकरणाची परवानगी
मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती
होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट
४) नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या
कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश
५) सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : कर्नाटक
🔺️ बोधकथा
सिंह आणि कोल्हा
राज्यकारभार फार वाढल्यामुळे सिंहाने प्रधान नेमण्यासाठी सभा बोलावली होती. त्याने आलेल्या प्रत्येकाची मुलाखत घेतली आणि कोल्ह्याची नेमणूक केली.सर्वांना ती पसंत पडली.सर्व पशु निघून गेले पण चित्ता तेथेच बसून राहिला .
सिंहाने त्याला विचारले," काय रे, काय हवे तुला ? चित्ता म्हणाला महाराज ,"तुम्ही कोल्ह्याची नेमणूक केली हे चांगलं नाही केलं. त्याला ना रंग,ना रूप!"
"मी बघा कसा आहे? माझा रंग बघा, माझे डोळे कसे आहेत बघा, माझी शेपूट बघा,माझ्यावर अन्याय झाला आहे."
सिंह म्हणाला," तू बोललास ते बरं झालं, मी मुलाखत घेतली ती प्रधानाच्या पदासाठी. हा बुद्धिमान असावा लागतो. रूप नसलं तरी चालेल.हे तुला समजत नाही हे तू सिद्ध केलंस. मी हे आधीच ओळखलं म्हणून तुला नेमलं नाही. चित्त्याला हे पटले तो मुकाट्याने निघून गेला.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon