सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 11 April

   

दैनिक परिपाठ

11 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

🔺️ दिनविशेष 
१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.

१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.

१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे-अर्थ : अनाथ करणे, पोरके करणे. 

▪️वाक्य : गेल्या वर्षी चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडून पांडूतात्या स्वर्गवासी झाले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : अडला हरी गाढवाचे पाय धरी 

▪️अर्थ  : अडचणीच्या काळात मूर्खांलापण मान द्यावा लागतो.

🔺️ कोडे 
▪️ ज न्म कृ ष्ट श्री मी ष्ण कोणता सण ? 

▪️उत्तर - श्रीकृष्ण जन्माष्टमी
 
🔺️ सामान्यज्ञान 
१) नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन
 २) fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)
३) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना
 ४) समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन
 लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्यप्रदेश
५) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्यप्रदेश
🔺️ बोधकथा
                 खरी संपत्ती
रामू नावाचा एक शेतकरी होता. तो शेतात खूप कष्ट करत असे . त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर पीक येत असे. त्याला तीन मुले होती .तीनही मुले खूप आळशी होती .त्यामुळे त्याला सतत चिंता वाटत असे की, आपल्यानंतर या मुलांचे कसे होणार? काही दिवसांनी रामू खूप आजारी पडला. त्याने आपल्या तीनही मुलांना जवळ बोलावले .तो म्हणाला," मी काही ह्या आजारातून बरा होईल असे वाटत नाही. तेव्हा जाता जाता एक गुपित सांगतो .आपल्या शेतात खूप धन ठेवलेले आहे." असे सांगितल्यानंतर काही वेळातच त्याचा जीव गेला.

कष्ट न करता धन मिळणार याचा मुलांना खूप आनंद झाला. हे धन शेतात नक्की कोणत्या ठिकाणी ठेवले आहे याची त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सर्व शेती खणून काढली.त्यांना कोठेही धन मिळाले नाही. शेवटी त्यांनी आयत्या धनाची आशा सोडून दिली आणि इतके खणले आहेच तर त्यात धान्य पेरून देऊ. असा विचार केला आणि त्यांनी धान्य पेरले.

भरपूर केलेल्या कष्टामुळे त्यावर्षी पीकही भरपूर मिळाले. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांना वडिलांच्या सांगण्याचा अर्थ समजला की शेतात खूप कष्ट केल्यावरच आपणास धन मिळेल. अशा तऱ्हेने त्यांना कष्टाचे महत्त्व समजले.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »