दैनिक परिपाठ
08 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
🔺️ दिनविशेष
१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
१९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले
२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : घोकंपट्टी करणे-अर्थ : अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.
▪️वाक्य : धडा नेहमी समजून घ्यावा; उगाच घोकंपट्टी करण्यात काय अर्थ आहे?
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
▪️अर्थ : कष्ट केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही.
🔺️ कोडे
▪️ ग ना मी च पं कोणता सण ?
▪️उत्तर - नागपंचमी
🔺️ सामान्यज्ञान
१)एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
२)भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे
आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 रोजी केरळ येथे.
३)भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020
४) भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020
५) राममंदिरचे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : पाच ऑगस्ट 2020.
🔺️ बोधकथा
फरक
एकदा एक राजा जंगला मध्ये शिकारीला गेला. तेथे तो खूप दमला, त्याला पिण्यास पाणी हवे होते. तो शोधत शोधत एका झोपडीपाशी गेला. तेथे त्या राजाला तेथील माणसाने विचारपूस केली, खायला दिले व पिण्यास पाणी दिले. त्याच्या ह्या आदरातिथ्याने राजा भारावून गेला व त्याने त्या माणसाला खुश होवून त्या जंगलाचा एक विशिष्ट परिसर भेट देवून टाकला. पण ज्याला हे भेट मिळाले त्याला त्या गोष्टीची जाणीव नव्हती किंबहुना तो मूर्ख होता असेच म्हणा की कारण ते जंगल चंदनाचे होते. ह्या माणसाला ते जंगल भेट मिळाल्यावर त्याने तेथील एक एक झाड तोडावयास सुरुवात केली व त्याचा कोळसा बनवून विकण्याचा उद्योग सुरु केला. त्यातून त्याला त्याच्या उदरनिर्वाह पुरते धन मिळू लागले. असे करत करत त्याला भेट मिळालेल्या भागातील २-3 झाडे शिल्लक राहिली. काही काळाने पावसाळा सुरु झाला. पावसाच्या मुळे त्याला झाडे तोडली तरी त्याचा कोळसा बनविता येईना, मग त्याने तशीच लाकडे घेवून बाजाराचे ठिकाण गाठले, तेथे येणाऱ्या हुशार व्यापा-यांनी त्याच्याकडील चंदनाची लाकडे ओळखली व त्याला धन दिले. त्या मूर्ख माणसाला हेच कळेना कि मी ह्याच लाकडाचा कोळसा विकत होतो मला कमी पैसे मिळत होते पण आता मी लाकडे आणली तर इतके का पैसे मिळत आहेत. त्याने त्याचे कारण विचारले त्या वेळेला व्यापा-यांनी त्याला सांगितले '' अरे वेड्या ! चंदन आणि त्याचा कोळसा ह्यात काही तरी फरक आहे कि नाही. तुला जर हे कळत असते तर तू आता आम्हालाही विकत घेतले असते इतका श्रीमंत झाला असता. '' शेवटी त्या मूर्ख माणसाला चंदनाचे जंगले भेट मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही.
तात्पर्य- मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तोच शहाणा ठरतो.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon