सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 60

  

ज्ञानकुंभ - 60
 शेवटी 'डा' हे अक्षर येणारे तीन अक्षरी शब्द सांगा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

❇️ मंगळवार दिनांक 07/04/2026

उपक्रम : शेवटी 'डा' हे अक्षर येणारे तीन अक्षरी शब्द सांगा.

🔺️ प्रश्नसूची

१. तोंडाचा खाण्यासाठीचा भाग -

२. भिंतीतील मोकळी जागा -

३. याचा रंग तीन दिवस -

४. पावसाळी पवित्र वनस्पती -

५. रतीब/गरमी -

६. रंग बदलू प्राणी -

७. ओलावारहित -

८. वस्त्र -

९. अधोमुख -

१०. एक मंगल वाद्य -

११. कडीचा साथी -

१२. एक मळखाऊ रंग

१३. वक्र -

१४. जादा रुंद -

१५. वेढा -

१६. शाहिरी कवन -

१७. बिच्चारा -

१८. तगादा -

१९. कुंकवाची डबी -

२०. बैलगाडी -

२१. हाडांचा सापळा -

२२. निकाल -

२३. एक पक्षी -

२४. नांगीदार पाणजीव -

२५. अेक शेंगभाजी

२६. लोकप्रिय खाद्य पदार्थ -

२७. भांडण -

२८. पहाट आरती -

२९. ठोकण्याचे हत्यार -

३०. पावलाचा पुढचा भाग -

३१. भाजलेली ज्वारीची कणसं -

३२. नाकखुपसू -

३३. अत्यल्प वस्त्रधारक -

३४. एक लोकनृत्य -

३५. एक केशरचना -

३६. साधाभोळा -

३७. केतकी -

३८. जाडंभरडं सुती -

३९. पोटातील कळा -

४०. मूर्ख/बिनडोक -

४१. मिरचीचे व्यंजन खरादा -

४२. पोक असलेला -

४३. पहाटेचा आकाशरंग -

४४. डाका -

४५. हा पैशाचा किंवा काचेचा होतो -

🔺️ उत्तरसूची

१. तोंडाचा खाण्यासाठीचा भाग - जबडा

२. भिंतीतील मोकळी जागा - कोनाडा

३. याचा रंग तीन दिवस - तेरडा

४. पावसाळी पवित्र वनस्पती - आघाडा

५. रतीब/गरमी - उकाडा

६. रंग बदलू प्राणी - सरडा

७. ओलावारहित - कोरडा

८. वस्त्र - कपडा

९. अधोमुख - मुखडा

१०. एक मंगल वाद्य - चौघडा

११. कडीचा साथी - कोयंडा

१२. एक मळखाऊ रंग - करडा

१३. वक्र - वाकडा

१४. जादा रुंद - फताडा

१५. वेढा - गराडा

१६. शाहिरी कवन - पोवाडा

१७. बिच्चारा - भाबडा

१८. तगादा - लकडा 

१९. कुंकवाची डबी - करंडा

२०. बैलगाडी - छकडा

२१. हाडांचा सापळा - सांगाडा

२२. निकाल - निवाडा

२३. एक पक्षी - कोंबडा

२४. नांगीदार पाणजीव - खेकडा

२५. एक शेंगभाजी - घेवडा

२६. लोकप्रिय खाद्यपदार्थ - चिवडा

२७. भांडण - झगडा

२८. पहाट आरती - काकडा

२९. ठोकण्याचे हत्यार - हातोडा

३०. पावलाचा पुढचा भाग - चवडा

३१. भाजलेली ज्वारीची कणसं - हुरडा

३२. नाकखुपसू - चोंबडा

३३. अत्यल्प वस्त्रधारक - उघडा

३४. एक लोकनृत्य - भांगडा

३५. एक केशरचना - अंबाडा

३६. साधाभोळा - भाबडा

३७. केतकी - केवडा

३८. जाडंभरडं सुती - सुताडा

३९. पोटातील कळा - मुरडा

४०. मूर्ख/बिनडोक - गधडा

४१. मिरचीचे व्यंजन खरादा - खरडा

४२. पोक असलेला - कुबडा

४३. पहाटेचा आकाशरंग - तांबडा

४४. डाका - दरोडा

४५. हा पैशाचा किंवा काचेचा होतो - चुराडा

Previous
Next Post »