सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 27 March

   

दैनिक परिपाठ

27 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

🔺️ दिनविशेष 
१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.

१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :    किरकिर करणे-अर्थ : एखादया गोष्टीबाबत सतत तक्रार करणे. 

▪️वाक्य : मालकापाशी मजूर ‘पगार कमी आहे’ म्हणून किरकिर करतात.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण :  कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे 

▪️अर्थ  : मूळचा स्वभाव बदलत नाही.

🔺️ कोडे 
▪️ मी उमलतो दलदल चिखलात.मी कोण? 
▪️उत्तर - कमळ

🔺️ सामान्यज्ञान 
१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी
२) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी
३) भारतामध्ये सर्वांत पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश 
४) इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह
५) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम
🔺️ बोधकथा
                  मैत्रीची परीक्षा
दोन मित्र जंगलातून जात होते. अचानक त्यांच्यासमोर एक मोठे अस्वल आले. एक मित्र पटकन जवळच्या झाडावर चढला, पण दुसऱ्याला झाडावर चढता येत नव्हते. त्याने युक्ती लढवली आणि तो जमिनीवर श्वास रोखून मेल्यासारखा पडून राहिला.

​अस्वल जवळ आले, त्याने त्याच्या कानापाशी हुंगले आणि तो मेला आहे असे समजून निघून गेले. अस्वल गेल्यावर झाडावरचा मित्र खाली आला आणि त्याने गमतीने विचारले, "अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले?"

दुसरा मित्र म्हणाला, "अस्वलाने सांगितले की, संकटाच्या वेळी सोडून जाणाऱ्या मित्रावर कधीही विश्वास ठेवू नकोस."

बोध : संकटाच्या वेळी जो कामाला येतो, तोच खरा मित्र.           
 

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »