ज्ञानकुंभ - 46
शेवटी 'डा' हे अक्षर येणारे तीन अक्षरी शब्द सांगा.
🔶️ संकलित
❇️ बुधवार दिनांक 18/03/2026
उपक्रम : शेवटी 'डा' हे अक्षर येणारे तीन अक्षरी शब्द सांगा.
🔺️ प्रश्नसूची
१) तोंडाचा खाण्यासाठीचा भाग -
२) भिंतीतील मोकळी जागा -
३) याचा रंग तीन दिवस -
४) पावसाळी पवित्र वनस्पती-
५) रंग बदलू प्राणी -
६) ओलावारहित -
७) अधोमुख -
८) एक मंगल वाद्य -
९) कडीचा साथी -
१०) एक मळखाऊ रंग -
११) वक्र -
१२) वेढा -
१३) शाहिरी कवन -
१४) बैलगाडी -
१५) हाडांचा सापळा -
१६) नांगीदार पाणजीव -
१७) एक शेंगभाजी -
१८) ठोकण्याचे हत्यार -
१९) पावलाचा पुढचा भाग -
२०) भाजलेली ज्वारीची कणसे -
२१) अत्यल्प वस्त्रधारक -
२२) एक लोकनृत्य
२३)एक केशरचना -
२४) साधाभोळा-
२५) पोटातील कळ -
२६) हा पैशाचा किंवा काचेचा होतो -
🔺️ उत्तरसूची
१) तोंडाचा खाण्यासाठीचा भाग - जबडा
२) भिंतीतील मोकळी जागा- कोनाडा
३) याचा रंग तीन दिवस - सरडा
४) पावसाळी पवित्र वनस्पती- केवडा
५) रंग बदलू प्राणी - सरडा
६) ओलावारहित - कोरडा
७) अधोमुख - उपडा
८) एक मंगल वाद्य - चौघडा
९) कडीचा साथी - कोयंडा
१०) एक मळखाऊ रंग - करडा
११) वक्र - वाकडा
१२) वेढा - गराडा
१३) शाहिरी कवन - पोवाडा
१४) बैलगाडी - छकडा
१५) हाडांचा सापळा - सांगाडा
१६) नांगीदार पाणजीव - खेकडा
१७) एक शेंगभाजी - घेवडा
१८) ठोकण्याचे हत्यार - हातोडा
१९) पावलाचा पुढचा भाग - चवडा
२०) भाजलेली ज्वारीची कणसं - हुरडा
२१) अत्यल्प वस्त्रधारक - उघडा
२२) एक लोकनृत्य - भांगडा
२३) एक केशरचना - अंबाडा
२४) साधाभोळा- भाबडा
२५) पोटातील कळ - मुरडा
२६) हा पैशाचा किंवा काचेचा होतो - चुराडा

ConversionConversion EmoticonEmoticon