ज्ञानकुंभ - 37
प्राणी,पक्षी,फूल,फळ या विषयी कोडी
🔶️ संकलित
❇️ शुक्रवार दिनांक 06/03/2026
उपक्रम :प्राणी,पक्षी,फूल,फळ या विषयी कोडी
🔺️ प्रश्नसूची
(१) समाजसेवक हा काळा काळा,मिळता घास,गोळा करी गोतावळा
(२) काळा काळा हा वसंताचा दूत,पंचमाशी त्याचं चांगलंच सूत
(३) कोणता हा वृक्ष ? हा तर कोकणातला कल्पवृक्ष.
(४) कोणतं हे फूल,राजाच की, अंगावर सुंदर पाकळ्यांची झूल ?
(५) कोण हा पक्षी,अंगावर ज्याच्या इंद्रधनूची नक्षी !
(६) कोण हा पक्षी, हा तर पिंडदान भक्ष्यी !
(७) कोण हा पक्षी,न चुकता रोज पहाटे उठवतो सर्वां अक्षी
(८) कोणतं हे फळ,पोटात ह्याच्या पाणी मधूर निर्मळ.
(९) कोणता हा प्राणी,पोटाच्या पिशवीत ठेवी बाळ, असा हा गुणी.
(१०) कोणता हा प्राणी,वाहत राही ओझी गोणी गोणी !
🔺️उत्तरसूची
(१) समाजसेवक हा काळा काळा,मिळता घास,गोळा करी गोतावळा
उत्तर : कावळा
(२) काळा काळा हा वसंताचा दूत,पंचमाशी त्याचं चांगलंच सूत.
उत्तर :- कोकिळ
(३) कोणता हा वृक्ष ? हा तर कोकणातला कल्पवृक्ष.
उत्तर :- नारळ
(४) कोणतं हे फूल,राजाच की, अंगावर सुंदर पाकळ्यांची झूल ?
उत्तर :- गुलाब
(५) कोण हा पक्षी,अंगावर ज्याच्या इंद्रधनूची नक्षी !
उत्तर :- मोर
(६) कोण हा पक्षी, हा तर पिंडदान भक्ष्यी !
उत्तर :- कावळा
(७) कोण हा पक्षी,न चुकता रोज पहाटे उठवतो सर्वां अक्षी
उत्तर :- कोंबडा
(८) कोणतं हे फळ,पोटात ह्याच्या पाणी मधूर निर्मळ
उत्तर :- नारळ
(९) कोणता हा प्राणी,पोटाच्या पिशवीत ठेवी बाळ,असा हा गुणी.
उत्तर :- कांगारू
(१०) कोणता हा प्राणी,वाहत राही ओझी गोणी गोणी !
उत्तर :- गाढव

ConversionConversion EmoticonEmoticon