सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 27 February

दैनिक परिपाठ

27 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

🔺️ दिनविशेष 
१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.

२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

२००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  अमलात आणणे - अर्थ : कारवाई करणे. 

▪️वाक्य : माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय अमलात आणला.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

▪️अर्थ  : अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.

🔺️ कोडे 
▪️दोन पाय आहेत पण चालत नाही, शरीरावर केस आहेत पण हलत नाही.

उत्तर - कात्री

🔺️ सामान्यज्ञान 
१) शिवरायांनी महाराष्ट्रात कोणते
स्वराज्य स्थापन केले ?
उत्तर - हिंदवी स्वराज्य
२) विजयनगरच्या सम्राटाचे नाव काय ?
उत्तर -  कृष्णदेवराय

३) पृथ्वी किती खंडांनी बनली आहे ?
उत्तर - सात

४) भर कोर्टात स्वतःचे नाव आझाद
सांगणारे कोण?
उत्तर - चंद्रशेखर
५) डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते ?
उत्तर -  स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती


🔺️ बोधकथा
                यक्ष आणि यक्षिणी
एका चंदन व्यापाऱ्याला २ मुले होती. एकदा व्यापाऱ्याने व्यापाराच्या निमित्ताने दोघांना अरब देशात पाठवले, दोघेही जहाजाने गेले. दुर्दैवाने वादळात अडकल्याने जहाज भरकटले आणि दोघेही भाऊ एका बेटावर आले. तेथे एका यक्षिणीची भेट झाली. ती अत्यंत सुंदर होती. यक्षिणीने तिचा सुंदर असा महाल पाहण्यास त्यांना नेले. तेथे गेल्यावर त्यांचा दोघांचा सत्कार केला. दोघेही खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी ते बेटावर फिरायला निघाले, तेव्हा एका व्यापाऱ्याला गंभीर अवस्थेत पाहिले, त्याला विचारल्यावर त्याचेही जहाज भरकटल्याचे त्याने सांगितले, येथे एका यक्षिणीने त्याचे स्वागत केले, परंतु एका गोष्टीवरून नाराज होवून तिने त्याचे हाल केले. व्यापाऱ्याने पुढे सांगितले, एका निश्चित तिथीला येथे एक यक्ष घोड्याचे रूप धारण करून येतो आणि प्रार्थना केल्यानंतर समुद्राच्या पलीकडे नेवून सोडतो परंतु त्या घोड्यावर स्वार झालेल्या व्यक्तीने मागे पळत येणाऱ्या यक्षिणीकडे वळून पाहिल्यानंतर तो यक्ष त्या व्यक्तीला समुद्रात फेकून देतो. दोन्ही भावांनीही त्या यक्षाला समुद्राच्या पलीकडे नेवून सोडण्याची विनंती केली. यक्षाने ती मान्य केली. दोघेही यक्ष बरोबर घोड्यावर स्वार झाले. त्याबरोबर मागे थांबण्यासाठी आवाज दिला. लहान भाऊ स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने मागे वळून यक्षिणीकडे पाहिले त्याबरोबर यक्षाने त्याला समुद्रात फेकून दिले. त्याक्षणी यक्ष म्हणाला , हे मूर्ख मनुष्या! तू स्वत:वर नियंत्रण न केल्याने तुला मृत्यू हा स्वीकारावा लागेल." लहान भावाने ऐकले पण खूप उशीर झाला होता. खोल समुद्रात बुडून तो मरण पावला.
तात्पर्य - एखादी गोष्टीचे दुष्परिणाम माहित असताना सुद्धा जर मानवाने स्व: नियंत्रण केले नाही त्याचे फळ भोगावे लागते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »