सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 26 February

दैनिक परिपाठ

26 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

🔺️ दिनविशेष 
१९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.

१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

१९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.

१९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  अभिलाषा धरणे-अर्थ : एखादया गोष्टीची इच्छा बाळगणे. 

▪️वाक्य : आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : गर्जेल तो पडेल काय 

▪️अर्थ  : नुसता बोलणं कृती काही नाही.

🔺️ कोडे 
▪️काही महिने 31 दिवसाचे असतात तर मग किती महिने 28 दिवसाचे असतात ? 

▪️उत्तरः प्रत्येक महिन्यात 28 दिवस असतात.

🔺️ सामान्यज्ञान 
०१) मृत्युंजय व छावा या कांदबरीचे लेखक कोण ?
- शिवाजी सावंत

०२) शिर्डी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
- राहाता

०३) सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणता ?
- सुबोध रत्नाकर

०४) माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे ?
- बिंदुसरा

०५) कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते ?
- काजू


🔺️ बोधकथा 
                        गुरुपदेश 
एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे, हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल.
तात्पर्य :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ - काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »