सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 21 February

दैनिक परिपाठ

21 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

🔺️ दिनविशेष 

१९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

१९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

१९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 

▪️वाक्प्रचार व अर्थ :  अजरामर होणे -अर्थ : कायमस्वरूपी टिकणे. 

▪️वाक्य : क्रांतिकारकांचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झाले आहे.

🔺️ म्हणी व अर्थ 

▪️म्हण : अंधारात केले पण उजेडात आले.

▪️अर्थ  : कितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येतेच.

🔺️ कोडे

▪️तार तार तारले, विजापूर मारले, बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले.

उत्तर - उंबराचे फूल

🔺️ सामान्यज्ञान 

१) हैदराबाद शहराचे जुने नाव सांगा .
उत्तर - भाग्यनगर

२) मेजर ध्यानचंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिन साजरा करतात?
उत्तर - राष्ट्रीय क्रीडा दिन
३) 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाचे लेखक
कोण ?
उत्तर - नरेंद्र मोदी
४) तंबाखूचे उत्पादन कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात घेतले जाते ?
उत्तर -  आंध्रप्रदेश
५) तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनाचे
वैशिष्ट्य कोणते ?
उत्तर - खंजिरी भजन


🔺️ बोधकथा

चतुर ससा आणि गर्विष्ठ सिंह

एका मोठ्या जंगलात भासुरक नावाचा एक अत्यंत क्रूर सिंह राहत होता. तो रोज अनेक प्राण्यांची शिकार करायचा. शेवटी सर्व प्राण्यांनी मिळून एक मार्ग काढला. त्यांनी सिंहाला विनंती केली की, "महाराज, तुम्ही शिकार करू नका, आम्ही रोज स्वतःहून एक प्राणी तुमच्याकडे पाठवू." सिंह तयार झाला.

​एके दिवशी एका लहान सशाची बारी आली. ससा खूप हुशार होता. त्याला मरण्याची मुळीच इच्छा नव्हती, म्हणून त्याने सिंहाला धडा शिकवण्याचे ठरवले. तो मुद्दाम उशिरा सिंहाकडे पोहोचला.

​सिंह भुकेने व्याकुळ झाला होता. त्याने रागाने विचारले, "तू एवढा उशिरा का आलास?"

​ससा नम्रपणे म्हणाला, "महाराज, मी येतच होतो, पण वाटेत मला दुसरा एक सिंह भेटला. तो म्हणत होता की तोच या जंगलाचा राजा आहे."

​हे ऐकून भासुरक सिंह संतापला. त्याने सशाला सांगितले की मला त्या दुसऱ्या सिंहाकडे घेऊन चल. ससा त्याला एका खोल विहिरीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, "महाराज, तो याच किल्ल्यात लपून बसला आहे."

​सिंहाने विहिरीत वाकून पाहिले, तर त्याला स्वतःचेच प्रतिबिंब पाण्यात दिसले. त्याला वाटले की तोच दुसरा सिंह आहे. तो रागाने विहिरीत जोरात गर्जना करू लागला. विहिरीतूनही तसाच प्रतिध्वनी आला. शेवटी चिडून त्या दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी भासुरक सिंहाने विहिरीत उडी मारली आणि तो तिथेच बुडून मेला.

​अशा प्रकारे सशाने आपल्या चातुर्याने स्वतःचे आणि जंगलातील इतर सर्व प्राण्यांचे प्राण वाचवले.

तात्पर्य : बुद्धी ही शक्तीपेक्षा नेहमी श्रेष्ठ असते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »