सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 19 February

दैनिक परिपाठ

19 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7


🔺️सुविचार 
गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो,असे म्हणत हसणे उतम !

🔺️ दिनविशेष 
१८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.

१८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.

१९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.

२००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : हाय खाणे- धास्ती घेणे. 

▪️वाक्य : नवऱ्याच्या अपघातानंतर निर्मलाने हाय खाल्ली.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ 

▪️अर्थ  : दुर्जन माणसाची संगत जीवाला धोका निर्माण करू शकते.

🔺️ कोडे 
▪️बाहेरून काटेरी, आतून रसाळ गरे, ओळखा पाहू कोण, चवीला एकदम खरे?

उत्तर : फणस

🔺️ सामान्यज्ञान 
०१) नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
- महाराष्ट्र.

०२) गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
- महात्मा जोतिबा फुले.

०३) स्वतंत्र भारताचे पहिले श्रम मंत्री कोण होते ?
- जगजीवन राम.

०४) महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे किती आहेत ?
- छत्तीस.

०५) करडी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
- खत उत्पादन.




🔺️ बोधकथा

                राजाचा अंत 

एका देशाचा राजा हा लालची होता. तो आपली तिजोरी भरण्यासाठी प्रजेवर वेगवेगळे कर लादीत असे. एकदा राजा खूप आजारी पडला, अंतिम घटिका जवळ आली, यमाचे दूत नेण्यासाठी समोर उभे ठाकले असता, यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली,"हे यमदूत! मला आणखी काही दिवस जगू दे, मी प्रजेच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केल्या आहेत. त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे." 

यमदुताने त्याला म्हटले, "राजन! प्रत्येक मनुष्य अमर होवू इच्छितो, पण ते शक्य नाही." हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरूच होता. तेव्हा यमदुताने राजाच्या हातात एक कलश देत सांगितले, "ह्या कलशात तुझे जीवनजल भरले आहे. जोपर्यंत तू हे पीत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील." राजाने विचारले," परंतु हे जल संपले तर?" यमदूत म्हणाले," तू थोडे थोडे पीत राहा ते दीर्घकाळ पर्यंत जाईल आणि तू जिवंत राहशील, एकदाच पिण्याचा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे." 

राजाने काही दिवसांपर्यंत थोडे थोडे जीवन जल पिणे पसंत केलं आणि त्यानुसार दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत गेला. पण एकेदिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिऊन अमर होण्याचा विचार आला. त्याने तो अंमलात आणला आणि त्याचबरोबर यमदूतानी सांगितलेले पण खरे झाले. राजाचे मरण त्याचवेळी आले.

तात्पर्य - लोभाचा अंत कष्ट,संकट, विफलतेशी असतो. त्यामुळे मनावर संयम असणे हेच चांगले असते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »