ज्ञानकुंभ - 23
तिसरे अक्षर 'न' असलेले शब्द शोधा.
🔶️ संकलित
❇️ शनिवार दि.14/02/2026
उपक्रम : तिसरे अक्षर 'न' असलेले शब्द शोधा.
🔺️ प्रश्नसूची
👉 सूचना :
1) उत्तरे पाच अक्षरी आहेत.
2) तिसरे अक्षर 'न' हवे.
(त्यात कोणतेही चिन्ह नको.)
उदा.आवळ्याचे औषध, टाॅनिक - च्यवनप्राश
१ एकमत करणे
२ शब्द मोडणे
३ नभास छेदणारे
४ छोटेसे
५ धनुष्याकृती
६ नवनिर्मितीक्षम
७ जड, भारी
८ सांभाळ करणारा
९ परतीच्या बोलीवर मागत राहणे
१० नभास स्पर्श करणारे
११ कथेकरी
१२ हनुमानांचे नामविशेषण
१३ आयुष्यक्रम-कथा
१४ पारावरील वाचन
१५ पगारवाढ
१६ मालकीचे गाव असलेला
१७ मोठ्या जमिनीचा मालक
१८ प्रामाणिक
१९ मनन करणारा
२० सोशिक
२१ जीवनाचा , राहणीचा स्तर
२२ असे शुद्ध सोने
🔺️ उत्तरसूची
१ एकमत करणे - संगनमत
२ शब्द मोडणे - वचनभंग
३ नभास छेदणारे- गगनभेदी
४ छोटेसे- लहानगेसे
५ धनुष्याकृती - कमानदार
६ नवनिर्मितीक्षम - सृजनशील
७ जड , भारी - वजनदार
८ सांभाळ करणारा - पालनहार
९ परतीच्या बोलीवर मागत राहणे - उसनवार
१० नभास स्पर्श करणारे - गगनचुंबी
११ कथेकरी- कथनकार
१२ हनुमानांचे नामविशेषण - पवनपुत्र
१३ आयुष्यक्रम-कथा - जीवनगाथा
१४ पारावरील वाचन - वाचनकट्टा
१५ पगारवाढ - वेतनवाढ
१६ मालकीचे गाव असलेला - वतनदार
१७ मोठ्या जमिनीचा मालक - जमीनदार
१८ प्रामाणिक - इमानदार
१९ मनन करणारा - चिंतनशील
२० सोशिक - सहनशील
२१ जीवनाचा, राहणीचा स्तर - जीवनशैली
२२ असे शुद्ध सोने - बावनकशी

ConversionConversion EmoticonEmoticon