सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

43 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Quiz

        

 📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.43

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) 

 📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : श्री.मोहन सनगाळे सर,सिंधुदुर्ग 

● लेखप्रपंच : गजानन दशरथ पोटे,अकोला

|| छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत ||

          महाराष्ट्राच्या मातीला अनेक महापुरुषांचा सहवास लाभला आहे.ही संतांची,वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. या मातीला शौर्याचा,पराक्रमाचा मानवतेचा, विद्वत्तेचा, धार्मिकतेचा गंध लाभलेला आहे.अशा या महाराष्ट्रात अंधकार पसरलेला होता. धर्म, संस्कृती,देव आणि धर्म संकटात होते. अधर्म,अत्याचार होत होते.अशा काळरात्रीला संपविण्यासाठी आई जिजाऊ नावाचा एक किरण चमकला. आऊसाहेब जिजाऊंनी तुळजाईला,आई शिवाईला या अधर्माचा सामना करण्यासाठी, अन्यायाचा काळोख संपविण्यासाठी एक पुत्र मागितला.आई भवानीने या आईची हाक ऐकली व छत्रपती शिवरायरूपी तेजस्वी, महापराक्रमी योध्दा, महाराष्ट्राचा तारणहार जन्मास आला. महाराष्ट्राची संस्कृती,मराठी धर्म, महाराष्ट्राचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. 

       छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच खरं दैवत. महाराजांचं नाव घेतलं की मन स्थिर होतं. त्यांची तस्वीर बघितली की, संकटाशी सामना करण्याचं बळ येतं असं हे आमचं दैवत. महाराज ज्यांना समजले,महाराजांच कार्य ज्यांना उमगलं अशी व्यक्ती महाराजांचे नाव आदराने उच्चारते.आमचे महाराज होते म्हणून धर्म टिकला,आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र धर्म जागला. महाराजांमुळेच स्वराज्याचा भगवा फडकला. ज्या राजाने जगणे शिकवले,ज्या राजाने संस्कार जपले,मान- सन्मान दिला अशा राजांचा उल्लेख सन्मानपूर्वक करावा.ज्या देवाची मंदिरे ज्या राजाने वाचवली तो राजा त्या देवापेक्षा महानच आहे म्हणून त्यांचा उल्लेख हा छत्रपती शिवाजी महाराज असाच व्हायला हवा. ज्या महाराजांनी जातीभेद,धर्मभेद कधीच मानला नाही. अशा महान राजाला छत्रपती शिवराय,छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच आदराने उच्चारावे. आमच्यासाठी महाराज म्हणजे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आज आम्ही घेतो तो श्वास, खातो तो घास, पुजतो तो देव फक्त छत्रपती शिवरायांमुळेच. कारण आमचं खरं दैवत म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज! 

         🙏🏾जय शिवराय🙏🏾

🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावावृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.

▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.

▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर  Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.

▶️ Certificate  वर Click करा. कोणत्याही  Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.

▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.

▶️  Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा

प्रश्नमंजुषा 

🔺️ गुरुवार दिनांक 19/02/2026
🔺️ सूचना :  60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर लिंक आपोआप बंद होईल. आपला प्रतिसाद पहाता दुस-या दिवशी लिंक परत खुली करण्यात येईल.
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  43 सोडवा.
Previous
Next Post »