सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 21 January

दैनिक परिपाठ

21 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

🔺️ दिनविशेष 
२००० : ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

१९७२ : मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.

१९६१ : इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.

१८०५ : होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : फडशा पडणे- खाऊन संपवणे. 

▪️वाक्य : वाघाने हरणाचा फडशा पडला.

🔺️ म्हणी व अर्थ 

▪️म्हण : अंधारात केले पण उजेडात आले 

▪️अर्थ  : कितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येताच.

🔺️ कोडे 

▪️सोन्याची सुरी,भुईत पुरी
वर पटकार गमजा करी 
▪️उत्तर: गाजर

🔺️ सामान्यज्ञान 

१) माझे पुराण हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

उत्तर - बाया कर्वे

२) ताम्रयुगात लागलेला महत्त्वाचा शोध कोणता ?

उत्तर - चाकाचा शोध

३) चीनच्या राणीने कोणते तंत्र शोधून काढले ?

उत्तर - रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र

४) हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या देवतांची पूजा करीत असावेत ?

उत्तर - मातृदेवता व पशुपती

५) भारतीय उपखंडातील संस्कृती कोणत्या नावाने ओळखले जाते ?

उत्तर - हडप्पा संस्कृती

🔺️ बोधकथा

हंस आणि मासा 

एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू तेथे पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला. त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते. 

तात्पर्य - मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात. 

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »