सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 19 January

  

दैनिक परिपाठ

19 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 
ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते ; तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

🔺️ दिनविशेष 
१९९६ : उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड

१९९६ : प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची

१९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड

१९८६ : (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली..

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : पारा चढणे - राग येणे. 
▪️वाक्य : वर्गात मुलांचा गोंधळ पाहून शिक्षकांचा पारा चढला.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ 
▪️अर्थ  : दुर्जन माणसाची संगत जीवाला धोका निर्माण करू शकते.

🔺️ कोडे 

▪️चार बोटे आणि एक अंगठा 
तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही 
सर्वजण बेजान म्हणतात मला 
तरी नेहमी उपयोगी मी राही 
सांगा पाहू मी कोण? 
▪️उत्तर- हातमोजे

🔺️ सामान्यज्ञान 

१) भारताच्या झेंड्याचा वरचा रंग कोणता ?
उत्तर : केशरी

२) 'असंतोषाचे जनक' असे इंग्रजांनी कोणाला संबोधले होते ?
उत्तर :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

३) आपली राष्ट्रभाषा कोणती ?
उत्तर :  हिंदी

४) भारताला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो ?
उत्तर : नैऋत्य मोसमी

५) डॉक्टर जगदीश चंद्र बोस कोण आहेत ?
उत्तर :  भारतीय वैज्ञानिक

🔺️ बोधकथा

क्रोधावर नियंत्रण

एक १०-१२ वर्षाचा मुलगा होता. लहानपणापासूनच खूप हट्टी आणि संतापी होता. जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडे तेंव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढे. रागाने तो वेडापिसा होत असे. त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला, वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेवून आले. मुलाने विचारले,"बाबा! हे खिळे कशासाठी?" वडिलांनी उत्तर दिले,"अरे ! तुला जेंव्हा कधी राग येईल तेंव्हा यातील एक खिळा घे आणि समोरच्या झाडावर ठोक". खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूप राग आला, त्याने एकूण ३० खिळे झाडाला ठोकले. असेच तो प्रत्येक वेळी करत गेला. पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश आले. आता तो झाडावर एखाददुसरा खिळाच ठोकत असे. त्याच्या हे लक्षात आले कि झाडाला खिळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणे कधीही सोपे आहे. शेवट एक दिवस तर असा उजाडला कि त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खिळा ठोकला नाही. जेंव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले तेंव्हा त्याच्या वडिल म्हणाले," तू जसे ते खिळे ठोकले तसे ते सर्व खिळे झाडावरून काढून टाक" मुलाने खिळे काढायला सुरुवात केली तसे त्याच्या लक्षात आले कि खिळे मारणे सोपे आहे पण खिळे काढणे खूप अवघड काम आहे. त्याने खूप मेहनत घेवून ते खिळे काढले व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेवून आला. वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणाले," तू काम तर चांगले केले. पण तुझ्या एक लक्षात आले कि नाही, बघ हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू किती खराब करून टाकले आहेस. तू जेंव्हा जेंव्हा रागाला येत होता त्याचे वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावे लागत होते. तसेच आपल्या वागण्याचेही तसेच असते असेच कि आपण जेंव्हा रागात येतो तेंव्हा आपल्या रागाचे दुष्परिणाम समोरच्याच्या मनावर होतात. शस्त्राने जेवढे घाव होणार नाहीत तेवढे जास्त वार रागाच्या भरात माणूस समोरच्यावर करतो. म्हणून रागापासून दूर राहणे हेच चांगले असते.

तात्पर्य-'अति राग आणि भिक माग' ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. राग आवरणे हेच चांगले.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »