सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 14 January

दैनिक परिपाठ

14 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

🔺️ दिनविशेष 

२००० : ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.

१९९४ : मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.

१९४८ : ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

१९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : पाठ थोपटने- शाबासकी देणे. 
▪️वाक्य : आशिषने केलेला अभ्यास पाहून सरांनी त्याची पाठ थोपटली.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : वारा पाहून पाठ फिरवावी 
▪️अर्थ  : वातावरण पाहून वागावे.

🔺️ कोडे
लाल डब्यात पांढरे दाणे, ओळखा पाहू मी कोण शहाणे?
उत्तर: डाळिंब

🔺️ सामान्यज्ञान 

१) भारताची उत्तरेकडील सीमा कोणत्या पर्वतामुळे तयार झालेली आहे?

उत्तर - हिमालय

२) कर्बोदके कशाला म्हणतात?

उत्तर - शरीराला ऊर्जा देणारे पिष्ट, शर्करा व तंतुमय पदार्थांना कर्बोदके म्हणतात.

३) उसामध्ये कोणती शर्करा असते ?

उत्तर - सुक्रोज

४) वायुकोशांत कोणत्या वायूंची देवाण घेवाण होते ?

उत्तर - ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड

५) शरीराचे एखादे काम एकत्रित रित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला काय म्हणतात ?

उत्तर - इंद्रिय संस्था

🔺️ बोधकथा 

तेनालीराम व रमैया

विजय नगराचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. या मध्ये जवळच्या राज्याचे राजे देखील सामील होऊन महाराजांसाठी काही न काही भेट वस्तू आणायचे. दर वर्षी प्रमाणे यंदा देखील महाराजांसाठी मौल्यवान भेटवस्तू आल्या होत्या. सर्व भेटवस्तूंमधे त्यांना चार रत्नजडित फुलदाण्या खूपच आवडल्या होत्या. महाराजांनी त्या चार ही फुलदाण्या आपल्या कक्षात ठेवल्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी एक सेवक नेमला. त्याचे नाव रमैया होते.

रमैया खूप लक्ष ठेवून त्या फुलदाण्यांची काळजी घेत होता कारण त्याला महाराजांनी आधीच त्या फुलदाण्यांची काळजी घेण्याचे सांगितले होते. त्या फुलदाण्यांचे काहीही नुकसान झाले तर तुला मृत्यूची शिक्षा देण्यात येईल अशी ताकीद महाराजांनी रमैयाला दिली होती. म्हणून तो त्या फुलदाण्यांची विशेष काळजी घेत होता. एके दिवशी रमैया त्या फुलदाण्याला स्वच्छ करताना त्याच्या हातून एक फुलदाणी पडते आणि फुटते. महाराजांना हे कळताच ते त्याला फाशीची शिक्षा देतात. त्याला अवघ्या चार दिवसानंतर फाश्यावर टांगण्यात येणार होते. तेनालीराम महाराजांकडे येतात आणि त्यांना त्यांच्या या निर्णयाबद्दल म्हणतात की - महाराज हे चुकीचे आहे, निव्वळ एका फुलदाणीसाठी आपण कोणाला शिक्षा कसे देऊ शकता? हे अन्याय आहे. त्या वेळी महाराज संतापले होते म्हणून त्यांनी तेनालीरामच्या गोष्टीचे उत्तर देणे योग्य समजले नाही. 

तेनालीराम नंतर रमैयाकडे गेले आणि त्याला म्हणाले की - 'आपण काळजी करू नका मी जसे सांगेन आपण तसेच करा. माझ्यावर विश्वास ठेवा मी आपल्याला काहीच होऊ देणार नाही. रमैया ने होकार दिला. रमैयाला फाशी देण्याचा दिवस आला. महाराज देखील त्या ठिकाणी होते त्यांनी रमैयाला त्याची शेवटची इच्छा विचारली. तेव्हा त्याने शेवटची इच्छा म्हणून ते तिन्ही फुलदाण्या मागविल्या ज्यांच्यामुळे त्याला फाश्यावर लटकविण्यात येत होते. रमैयाच्या इच्छांनुसार महाराजांनी तिन्ही फुलदाण्या मागविल्या. त्या फुलदाण्या समोर येताच रमैयाने त्या तिन्ही फुलदाण्या तेनालीरामच्या सांगण्यानुसार जमिनीवर आपटून तोडल्या. 

रमैयाच्या अशा वागणुकीवर महाराज फार चिडले आणि ओरडले 'अरे मूर्ख माणसा हे काय केले ? का बरं हे तोडले? 

त्यावर रमैया म्हणाला - 'महाराज मी एक फुलदाणी तोडली म्हणून आपण मला फाश्यावर देत आहात पण मी मेल्यावर जर अजून कोणाच्या हातून या फुलदाण्या तुटल्या तर अजून तीन लोकांचे जीव जाऊ नये म्हणून मी हे तोडले. आणि त्या तीन लोकांचे प्राण वाचवले. 

रमैया चे म्हणणे ऐकून महाराज शांत झाले आणि त्याला विचारले की कोणाच्या सांगण्यावरुन तू असे केलेस ? रमैया ने त्यांना सर्व सांगितले की तेनालीरामने असे करण्यासाठी सांगितले तेव्हा महाराजांनी तेनालीरामला जवळ बोलवून त्यांना म्हणाले की - 'तेनालीराम आज आपल्यामुळे एक निर्दोषाचे प्राण वाचले.

तात्पर्य : नेहमी रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे असतात.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »