सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 13 January

   

दैनिक परिपाठ

13 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.

🔺️ दिनविशेष 

१९९६ : पुणे – मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.

 १९६७ : पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.

१९६४ : कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार

१९५७ : हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : नाव मिळवणे- कीर्ती मिळवणे. 
▪️वाक्य : दिपकने अतिशय कष्ट करुन नाव मिळवले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर 
▪️अर्थ  : कोणताही एक पर्याय निवडा.

🔺️ कोडे

पांढरे शेत,काळे बी,रात्रंदिवस राबतो जो, तोच खरा कवी.

उत्तर : कागद आणि पेन

🔺️ सामान्यज्ञान 

१) सह्याद्री पर्वतास............ असेही म्हणतात.

उत्तर - पश्चिम घाट

२) गोदावरी नदीचा उगम ............येथे झाला आहे.

उत्तर - त्र्यंबकेश्वर

३) रावेर आणि बऱ्हाणपूर यांच्या दरम्यान.................. खिंड आहे.

उत्तर - ब-हाणपूर

४) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील सीमेवरील नदी कोणती?

उत्तर - इंद्रावती

५) पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या?

 उत्तर -वर्धा, वैनगंगा, इंद्रावती

🔺️ बोधकथा 

             गरुडाचे पिल्लू

​एका गरुडाचे अंडे चुकून कोंबड्यांच्या घरट्यात पडले. काही दिवसांनी त्या अंड्यातून गरुडाचे पिल्लू बाहेर आले. ते पिल्लू कोंबड्यांच्या पिलांसोबतच वाढले. ते त्यांच्यासारखेच दाणे टिपायचे, तसेच जमिनीवर थोडेसे उडायचे आणि त्यांच्यासारखाच आवाज काढायचे.​त्याला वाटायचे की आपण सुद्धा एक कोंबडीच आहोत.

​एक दिवस त्याने आकाशात एक मोठा पक्षी मोठ्या दिमाखात उडताना पाहिला. त्याने आपल्या आईला (कोंबडीला) विचारले, "आई, तो एवढ्या उंचावर उडणारा देखणा पक्षी कोणता आहे?"

​कोंबडी म्हणाली, "अरे तो गरुड आहे, पक्षांचा राजा! तो खूप शक्तिशाली असतो, पण आपण त्याच्यासारखे उडू शकत नाही कारण आपण कोंबड्या आहोत."

​त्या गरुडाच्या पिल्लाने हे मान्य केले आणि तो आयुष्यभर कोंबडीसारखाच जगला आणि शेवटी तसाच मेला. कारण त्याने कधीच स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवला नाही.

बोध (Moral):

आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असते, पण आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आणि विचारांचे ऐकून स्वतःला लहान समजतो. आपण कोण आहोत हे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे.          

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »