दैनिक परिपाठ
12 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.
🔺️ दिनविशेष
२००५ : राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना
१९९७ : सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ’बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान
१९३६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा
▪️वाक्प्रचार व अर्थ : कंप पावणे - धारातीर्थी पडणे
▪️वाक्य : लढाईत मरण येणे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : खायला काळ भुईला भार
▪️अर्थ : कामी न येणारा माणूस हा ओझं असतो.
🔺️ कोडे
▪️अशी कोणती गोष्ट आहे ; जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही.
▪️उत्तर- दूध
🔺️ सामान्यज्ञान
1) भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते ?
उत्तर - बेंगलोर
2) लोकसभा सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
उत्तर - लोकसभा उपसभापती
3) भारताचे पहिले महान्यायवादी कोण आहेत ?
उत्तर - एम.सी.सेटलवाड
4) जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
उत्तर - 11 सप्टेंबर
5) “करो या मरो” हा नारा महात्मा गांधींनी केव्हा दिला ?
उत्तर - सन 1942
🔺️ बोधकथा
मूर्ती वाहणारे गाढव
एकदा एक मूर्तिकार त्याने बनवलेली देवाची मूर्ती त्याच्या गाढवावर लादून चालला होता. मूर्ती अतिशय सुंदर होती. रस्त्याने जाता जाता लोकांना मूर्तीचे दर्शन होऊन आनंद होत होता.
मूर्तिकाराच्या अप्रतिम शिल्पाचे कौतुक करत आणि देवाकडे पाहुन भावुक होत लोक नतमस्तक होत होते.सगळे आदराने वाकून नमस्कार करत होते.एवढे कौतुक आणि आदर पाहुन गाढवाला आनंद झाला. त्याला वाटले आज इतक्या दिवसांनी लोकांना त्याचे कौतूक वाटत आहे. तो ह्या सन्मानाचा मनमुराद आनंद घेऊ लागला. ह्या आनंदाच्या भरात त्याचा वेग कमी होऊ लागला. त्याला आजची वेळ पूर्ण साजरी करायची होती. त्याच्या मालकाने दोन तीनदा त्याला आवाज देऊन पुढे चालायला सांगितले. गाढवाची तिथून निघण्याची इच्छाच होत नव्हती. त्याचं पाऊल पुढे पडत नव्हतं.
शेवटी गाढवाला मालकाचा रट्टा बसला.“अरे मुर्खां, लोक कशाला नमस्कार करत आहेत हे तरी समजुन घे. तुझ्यावरच्या मूर्तीला आदर दाखवत आहेत लोक. माणसाने गाढवाला वाकुन नमस्कार करावा एवढे वाईट दिवस नाही आले अजून.”
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon