छान छान गोष्टी भाग 294
वाचा रे वाचा! |
मूर्ती वाहणारे गाढव
एकदा एक मूर्तिकार त्याने बनवलेली देवाची मूर्ती त्याच्या गाढवावर लादून चालला होता.
मूर्ती अतिशय सुंदर होती.
रस्त्याने जाता जाता लोकांना मूर्तीचे दर्शन होऊन आनंद होत होता.
मूर्तिकाराच्या अप्रतिम शिल्पाचे कौतुक करत आणि देवाकडे पाहुन भावुक होत लोक नतमस्तक होत होते.
सगळे आदराने वाकून नमस्कार करत होते.
एवढे कौतुक आणि आदर पाहुन गाढवाला आनंद झाला.
त्याला वाटले आज इतक्या दिवसांनी लोकांना त्याचे कौतूक वाटत आहे.
तो ह्या सन्मानाचा मनमुराद आनंद घेऊ लागला.
ह्या आनंदाच्या भरात त्याचा वेग कमी होऊ लागला.
त्याला आजची वेळ पूर्ण साजरी करायची होती.
त्याच्या मालकाने दोन तीनदा त्याला आवाज देऊन पुढे चालायला सांगितले.
गाढवाची तिथून निघण्याची इच्छाच होत नव्हती.
त्याचं पाऊल पुढे पडत नव्हतं.
शेवटी गाढवाला मालकाचा रट्टा बसला.
“अरे मुर्खां, लोक कशाला नमस्कार करत आहेत हे तरी समजुन घे. तुझ्यावरच्या मूर्तीला आदर दाखवत आहेत लोक. माणसाने गाढवाला वाकुन नमस्कार करावा एवढे वाईट दिवस नाही आले अजून.”
🔺️ चित्ररूप पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon